शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांना जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. रवींद्र वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणाची फाईल अखेर बंद करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेने रवींद्र वायकर यांच्याविरोधात गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचे नमूद केले आहे.
मुंबईतील जोगेश्वरी येथील सुप्रिमो क्लबचा गैरवापर करून तिथे हॉटेल्स बांधताना माहिती लपवल्याचा आणि बनावट माहितीच्या आधारे महापालिकेकडून विविध परवानग्या घेण्यात आल्याप्रकरणी खासदार रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नीविरोधात प्रकरण दाखल होते. या प्रकरणातून त्यांना यापूर्वीचं क्लीन चीट देण्यात आली होती. अखेर शिवसेना खासदार रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नीविरोधात दाखल प्रकरण बंद करण्यात आले आहे.
आर्थिक गुन्हे शाखेने हे प्रकरण बंद करण्याची मागणी करणारा अहवाल न्यायालयात दाखल केला होता. मुंबई पोलिसांनी दाखल केलेला अहवाल महानगर दंडादाधिकारी न्यायालयाने मान्य केला आहे. मुंबई महापालिकेने वायकर यांच्याविरोधात गैरसमजातून गुन्हा दाखल केल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
हे ही वाचा :
झाशीमध्ये अग्नितांडव; रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० नवजात अर्भकांचा होरपळून मृत्यू
अहो, आश्चर्यम्… विळा-भोपळा एकत्र आला; एका सुरात बोलले जरांगे-मुंडे
पंतप्रधान मोदी भाजपाच्या १ लाख बूथ प्रमुखांशी साधणार संवाद!
गृहमंत्री शहांच्या हेलिकॉप्टरची तपासणी, म्हणाले, भाजपा सर्व नियमांचे पालन करते!
प्रकरण काय?
मुंबईतील जोगेश्वरी या भागात भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप रविंद्र वायकरांवर झाला होता. या कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणात रविंद्र वायकर यांचा सहभाग असल्याचा आरोप होता. मुंबई महापालिकेच्या जागेवर ५०० कोटींच्या ५ स्टार हॉटेलचं बांधकाम केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोडवर व्यारवली गावात या पालिकेच्या जमिनीवर बांधकाम झाल्याचे बोललं जात होतं. मुंबई महापालिकेच्या जागेवर असलेल्या या 5 स्टार हॉटेलची किंमत ५०० कोटींच्या घरात असल्याचा दावा भाजप नेत्यांकडून करण्यात आला होता. याप्रकरणी रविंद्र वायकर त्यांच्या पत्नी मनिषा आणि त्यांचे भागीदार आसू नेहलानी, राज लालचंदानी, प्रिथपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरूण दुबे यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.