उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी काँग्रेसच्या वारसा कराच्या प्रस्तावाची तुलना औरंगजेबशासित काळात हिंदूंवर लादल्या गेलेल्या जिझिया कराशी केली. त्यांनी काँग्रेसवर गोहत्येला प्रोत्साहन देण्याचाही आरोप केला. ते फिरोजाबाद येथील एका प्रचारसभेत बोलत होते. त्यांनी मैनपुरीत रोडशोही केला.
मुख्यमंत्री योगी यांनी फिरोजाबादमध्ये असे सांगितले की, काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात अल्पसंख्याकांना त्यांच्या पसंतीचे अन्न खाण्याचे स्वातंत्र्य देण्याचे जाहीर केले आहे. लखनऊतून प्रसिद्ध झालेले एक प्रसिद्धीपत्रक त्यांच्या हवाल्याने जाहीर करण्यात आले आहे. ‘बहुतेक भारतीय सांगतात की आम्ही गोमांस खात नाही, मात्र काही व्यक्ती मुद्दामहून लोकांना त्रास देण्यासाठी गोहत्येला प्रोत्साहन देतात,’ असे या निवेदनात नमूद केले आहे.
‘काँग्रेस-सपाच्या आघाडीचे एक व्हर्जन समोर आले आहे. त्यात वारसा कर लावण्याचा प्रस्ताव आहे. मात्र हा औरंगजेबाने हिंदूंवर लादलेल्या जिझिया करासारखा आहे. औरंगजेबाचे नवे अवतार जन्मले आहेत, जे म्हणत आहेत की वारसा कर लावू. ’ अशी टीका योगी यांनी केली. अयोध्येत राम मंदिर, काशीमध्ये काशी विश्वनाथ धामाची निर्मिती झाली आहे. शेकडो वर्षांपासून आम्ही सांगत आलोय की, मथुरेमध्ये जेवढी जमीन आहे, ती श्रीकृष्णाची आहे. एकीकडे मोदींच्या नेतृत्वाखाली वारसा आणि आस्थेचा सन्मान करणारे भाजप सरकार आहे तर, दुसरीकडे वारसा कर लावणारी काँग्रेस-सपाची इंडि आघाडी आहे, अशी टीका योगी यांनी केली.
हे ही वाचा:
इंदोरमध्ये लव्ह जिहाद; मुलीला अडकवण्यासाठी विवाहित शाहरूख शेख झाला यश जैन
दुबईला पुन्हा मुसळधार पावसाचा फटका
उद्धव ठाकरेंच्या जाहिरातीत पॉर्न स्टारची भूमिका!
अल्पवयीन हिंदू मुलीवर बलात्कार करून केले धर्मांतरण!
तर, इटाहमध्ये भाजपचे उमेदवार विश्वदीप सिंह यांच्या समर्थनार्थ काढलेल्या प्रचारफेरीत मुख्यमंत्र्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्माच्या आधारे आरक्षणाला विरोध केला होता, याची आठवण करून दिली. ‘असे असूनही काँग्रेस कथितरीत्या भारताचे इस्लामीकरण करण्याच्या उद्देशासाठी तालिबानसारखे कायदे लागू करू लागले आहे,’ असेही योगी म्हणाले.