31 C
Mumbai
Wednesday, November 6, 2024
घरक्राईमनामानवलानी प्रकरणी संजय राऊतांना दणका; किरीट सोमय्यांना दिलासा

नवलानी प्रकरणी संजय राऊतांना दणका; किरीट सोमय्यांना दिलासा

Google News Follow

Related

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना दणका बसला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे नेते किरीट सोमय्या आणि ईडीवर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी संजय राऊत यांनी आरोप केलेल्या जितेंद्र नवलानी विरोधात मुंबई लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला होत. मात्र, या आरोप- प्रत्यारोपांच्या मालिकेला आता पूर्णविराम मिळाला आहे. संजय राऊतांच्या आरोपांमुळे जितेंद्र नवलानी प्रकरणाची चौकशी आता मुंबई पोलिसांनी बरखास्त केली आहे.

संजय राऊत यांनी उद्योजक जितेंद्र नवलानी यांच्यामार्फत बिल्डरांकडून पैसे उकळल्याच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांवर केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेले विशेष तपास पथक (एसआयटी) मुंबई पोलिसांनी बरखास्त केल्याची माहिती बुधवार, ६ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली. या निर्णयामुळे किरीट सोमय्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन जितेंद्र नवलानी नावाची एक व्यक्ती ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून अनेक कंपन्यांकडून खंडणी वसूल करते असा आरोप केला होता. त्यानंतर ८ मार्च २०२१ रोजी शिवसैनिक अरविंद भोसले यांनी मुंबई पोलीस आयुक्त यांच्या नावे एक तक्रार दिली होती. या तक्रारारीच्या एक वर्षानंतर म्हणजे २२ मार्च या दिवशी मुंबई पोलिसांनी या तक्रारीच्या आधारावर जितेंद्र नवलानी संबंधीत पाच कंपन्यांना आणि ज्या कंपन्यांनी जितेंद्र नवलानी यांच्याशी संशयास्पद व्यवहार केलाय आहेत अशा कंपन्यांना आर्थिक गुन्हे शाखेने नोटीस बजावल्या आहेत.

हे ही वाचा:

माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा

मुख्यमंत्री भगवंत मान बनणार ‘दुल्हेराजा’

नुपूर शर्मांचे शीर कापणाऱ्यास घर देण्याची भाषा करणाऱ्या सलमान चिश्तीला अटक

‘नवं सरकार सर्वसामान्यांचं आहे’

तक्रारदार अरविंद भोसले यांनी आरोप केलाय की, ‘जितेंद्र नवलानी हे ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून अनेक कंपन्यांना ईडी कारवाईपासून वाचवण्यासाठी त्यांच्याकडून लाखो रुपये खंडणी घेतात. त्यांनी जितेंद्र नवलानी यांच्या पाच कंपन्यांची नावे दिली होती. बिलेनिअर हॉस्पिटल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिडेट, सिक्युरीओ सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड, प्रोंटो एंटरटेंमेंट प्रायव्हेट लिमिटेड, बोनांझा फॅशन मर्चंट, आणि ट्रिस्ट हॉस्पिटलिटी सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड. या पाच कंपन्यांच्या खात्यात ४१ विविध कंपन्यांचे ५९ कोटी रुपयांचे व्यवहार आहेत. हे व्यवहार करण्यामागचे कारण काय? अशी विचारणा अरविंद भोसले यांच्या तक्रारारीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने त्या ४१ कंपन्यांकडे केली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा