“अल्लाह को पता था कोरोना आनेवाला है, इसलिए कब्रस्तान बना” असे वादग्रस्त विधान राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. आव्हाड यांच्या या हास्यास्पद विधानावर समाज माध्यमांतून कडाडून टीका होत आहे.
मुंब्रा येथील एका नगरसेविकेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी नागरिकांशी संवाद साधताना, “अल्लाह को मालूम था २०११ में कोरोना आनेवाला है. तभी मुंब्रा में २०१९ में कब्रस्तान बना” असे आक्षेपार्ह वक्तव्य आव्हाड यांनी केले आहे. आव्हाड हे गेल्या अनेक वर्षांपासून मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून निवडून येत आहेत. मुंब्रा मतदारसंघामध्ये मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. आव्हाड यांच्या निवडून येण्यामागे मुस्लिम मतांचा मोठा हात आहे. मात्र, आता कोरोनाच्या संकटातील आपले अपयश झाकण्यासाठी त्यांनी थेट अल्लाचाच आधार घेतल्याची टीका होऊ लागली आहे.
हे ही वाचा:
कोरोनाचे संकट येणार हे अल्लाहला २०११ सालीच दिसले म्हणून २०१९ ला कब्रस्तान बनले, असे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे विधान करून मुस्लिम समाजाला खुश करण्याचे राजकारण आव्हाड यांनी केल्याचे व्हिडिओवरून दिसत आहे. आव्हाड यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरून चांगलाच व्हायरल झाला असून त्यावर आव्हाड यांनी अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही.