राष्ट्रवादीचे मंत्री विरुद्ध काँग्रेसचे आमदार! ट्विटरवर जुंपली

राष्ट्रवादीचे मंत्री विरुद्ध काँग्रेसचे आमदार! ट्विटरवर जुंपली

महाराष्ट्रातील ३०० आमदारांना सरकारमार्फत मुंबईत घरे देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतल्यापासून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी माविआमध्येही यावरून मतभेद आहेत. सत्ताधारी आमदार आणि मंत्र्यांमध्येच या मुद्द्यावरून जुंपल्याचे चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसचे युवा आमदार झिशान सिद्दिकी यांच्यात शनिवारी ट्विटर युद्ध रंगले होते.

वांद्रे पूर्व येथील काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी यांनी ट्विट करत आपल्याच सरकारवर निशाणा साधला. “मला महाराष्ट्र सरकार मार्फत घराची गरज नाही. माझ्या मतदारसंघातील हजारो नागरिकांना घरे मिळत नाहीयेत आणि ते हालाखीच्या परिस्थितीत जगत आहेत. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना विनंती करतो की आमदारांना घरे देण्यापेक्षा हा पैसा नागरिकांसाठी घरे बांधायला वापरावा”

हे ही वाचा:

चीनमधील त्या विमान अपघातात १३२ जणांचा मृत्यू

‘मातोश्री’ चरणी यशवंत जाधवांचे २ कोटी आणि ५० लाखांचे घड्याळ

‘२४ महिन्यांत ३८ मालमत्ता! मुंबईला ते कसं लुटतात हे उघड झालं’

‘महाराष्ट्र बारव मोहीम’ सुरू करणाऱ्या रोहन काळेंच पंतप्रधान मोदींकडून कौतुक

या ट्विटला उत्तर देताना जितेंद्र आव्हाड चांगलेच आक्रमक झालेले दिसले. “:तुमची आधीच मुंबईत करोडो रुपयांची दहा घरे आहेत. ही योजना फक्त ग्रामीण महाराष्ट्रातील आमदारांसाठी आहे आणि माझ्या मते तुम्हाला याची योग्य समज आहे की ही घरे फुकट दिली जात नाहीयेत.”

तर आव्हाडांच्या या उत्तरावर झिशान यांनीही पलटवार केला आहे. तुम्हाला अखेर ट्विटरवर मला उत्तर द्यायला वेळ मिळाला. गेले काही दिवस सभागृहात माझ्या वांद्रे पूर्व प्रभागातील SRA च्या प्रश्नावर उत्तर दिले नाहीत. राहता राहिला करोडो रुपयांच्या घरांचा प्रश्न तर तुमच्या मालकीची काय मालमत्ता आहे हे साऱ्या जगाला माहित्ये.

Exit mobile version