राज ठाकरेंनी काल ठाण्यात घेतलेल्या सभेत महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर सडकून टीका केली होती. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरेंनी कालच्या भाषणात भोंग्यांवरुन टीका करणाऱ्या मविआ नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. जयंत पाटील, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, संजय राऊत यांच्यावर राज ठाकरेंनी टीका केली.
मुंब्रा येथे अतिरेकी संघटनांशी संबंधित अनेक लोक पकडले गेल्याचा उल्लेख राज ठाकरे यांनी केल्यानंतर ते लोक मुंब्र्याचे नाहीत तर बाहेरून आले होते, असा बचाव जितेंद्र आव्हाड केला.
राज ठाकरे यांना डिमेन्शिया झाला आहे, त्यामुळे ते विसरतात. जातीयवाद तुमच्यामध्ये भरला आहे, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. राज ठाकरे हे राजकीय व्यासपीठावरील जॉनी लिव्हर आहेत. आमच्या संस्कारात शिवीगाळ बसत नाही, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाचे नियम डावलून राज ठाकरेंनी घेतली सभा घेतली आहे. त्यांच्या भाषणात ते महागाईच्या मुद्द्यावर गप्प का बसले आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
हे ही वाचा:
दोन वर्षांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंत्रालयाला भेट
गुणरत्ने सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलीस घेणार
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील लीपिकाला गाडीने उडवले
संजय राऊत म्हणतात, शिवराळ भाषेत माझ्या वेदना
मुंब्र्यात अतिरेकी सापडले प्रकरणावरून राज ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मुंब्र्यात एवढा बदल झाला आहे की तिथल लोकं दुसरा विचार करणार नाहीत. जे दहशतवादी मुंब्र्यात सापडले ते मुंब्र्याचे नव्हेत. एवढंच असेल तर मुंब्र्यातील दहशतवाद्यांची संख्या जाहीर करा, असे देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले.