जितेंद्र आव्हाड यांचे ईव्हीएम ‘घोटाळ्या’चे अजब तर्कट

भाजपाला तीन ठिकाणी जिंकण्यासाठी ईव्हीएममध्ये घोटाळा करायचा असतो!

जितेंद्र आव्हाड यांचे ईव्हीएम ‘घोटाळ्या’चे अजब तर्कट

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ईव्हीएमबाबत नवा ‘घोटाळा’ समोर आणला आहे. भारतीय जनता पक्ष तीन ठिकाणी जिंकण्यासाठी ईव्हीएममध्ये घोटाळा करतो मात्र बाकी राज्ये हातातून गेली तरी हरकत नाही, असे त्यांचे धोरण असते, असा अजब आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

त्यांनी व्हीडिओच्या माध्यमातून ईव्हीएमचा हा ‘घोटाळा’ सांगितला आहे.

ते म्हणाले की, ईव्हीएम हे धूर्तपणाने वापरले जाणारे हत्यार आहे. ते बाकीच्यांना राज्याच्या निवडणुका जिंकू देतात आणि दाखवून देतात की, ईव्हीएममध्ये घोटाळा नसतो. कारण त्यांना फक्त गुजरात, उत्तर प्रदेश, लोकसभा जिंकायचे असते. ईव्हीएमचा घोटाळा इथेच होतो. बाकी ठिकाणी राज्ये हातून गेली तर गेली. ईव्हीएममध्ये काही घोळ नाही असा विश्वास ते लोकांना देतात. पण घोटाळा ईव्हीएममध्येच ते करतात, म्हणून इतकी राज्ये जिंकूनही लोकसभेत काहीच होत नाही.

हे ही वाचा:

मोदींचा करिष्मा सोबत आहेच पण स्थानिक नेतृत्वाचे काय?

पॉवरलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राची पदकांची लूट  

कर्नाटकमध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमत; भाजपाची हार, जनता दलानेही गमावला विश्वास

अकोल्यात दोन गट एकमेकांना भिडले; एकाचा मृत्यू

कर्नाटकमध्ये झालेल्या निवडणुकीआधी ईव्हीएमच्या घोटाळ्याचा मुद्दा बराच चर्चिला गेला होता. नरेंद्र मोदी यांचे सरकार केंद्रात आल्यापासून या मुद्द्यावर विरोधक सातत्याने ईव्हीएममुळेच भाजपाला विजय प्राप्त होतो असे आरोप करत आलेले आहेत. अनेक राज्यात भाजपाने दणदणीत यश मिळविल्यानंतर ईव्हीएममुळेच हे यश त्यांना मिळत असल्याचा आरोपही केला गेला. पण आता जितेंद्र आव्हाड यांनी हा नवाच घोटाळा असल्याचे अजब तर्कट मांडले आहे.

मागे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ईव्हीएमला दोष देण्यात अर्थ नाही, असे वक्तव्य केले होते. बिहार, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, राजस्थान याठिकाणी विरोधक जिंकलेत मग ईव्हीएमचा फायदा भाजपाला कुठे मिळाला? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला होता.

Exit mobile version