26 C
Mumbai
Monday, January 6, 2025
घरराजकारणजितेंद्र आव्हाड गीता आणि कुराण घेऊन म्हणतात, मी कायदा हातात घेईन!

जितेंद्र आव्हाड गीता आणि कुराण घेऊन म्हणतात, मी कायदा हातात घेईन!

व्हीक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न

Google News Follow

Related

सातत्याने चर्चेत राहणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाड यांनी आता सोमवारी एक व्हीडिओ शेअर करत आपला कसा बळी दिला जाणार आहे, हे सांगितले. एका हातात भगवदगीता आणि दुसऱ्या हातात कुराण धरून त्यांनी आपल्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता सांगितली. हिंदीतून त्यांनी हा व्हीडिओ केला.

मुंब्रा येथे मध्यंतरी एकनाथ शिंदे यांच्या गाडीसमोर एका महिलेला आव्हाड यांनी धक्का दिला होता. त्यासंदर्भात त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावरूनच जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हीडिओ केला. त्यात ते म्हणतात की, ज्या महिलेच्या विरोधात गंभीर गुन्हा आहे त्याच महिलेला पोलिस संरक्षण देत आहेत. माझ्याविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद करण्याची तयारी सुरू आहे. जी गोष्ट मी केलीच नाही त्या गोष्टीसाठी मी गुन्हेगार बनणार नाही. कायद्याने हेच होणार असेल तर मी कायदा हातात घ्यायला तयार आहे.

हे ही वाचा:

चीन पुन्हा कोरोना पसरवतोय?

आमच्यासाठी संपूर्ण जग हाच आपला स्वदेश आहे

आम्ही तुझ्या सगळ्या ऍलर्जीवर उपचार करू!

सर्वोच्च न्यायालयात आज या दोन मोठ्या प्रकरणांवर सुनावणी

आव्हाड या व्हीडिओत म्हणाले की, माझ्याविरोधात ३५४सारखा गुन्हा दाखल केला तो माझ्या मनाला लागला आहे. माझ्यावर ३०४चा गुन्हा दाखल केला असता तरी चाललं असतं. माझ्याविरोधात गुन्हा दाखल केला जात आहे, त्याला पोलिसांचा पाठिंबा आहे. पण ज्या महिलेवर गुन्हा आहे, ती मात्र मोकळेपणाने फिरते आहे. मला यामुळे वेड लागलं आहे. पण कायद्याच्या विरोधात असेल तर असे काम माझ्या हातून होऊ नये. आव्हाड म्हणतात की, मी माझी लढाई एकटाच लढणार आहे. माझ्यामागे कोण आहेत हे मी कधीही पाहिले नाही. हे दुःख माझ्या मनात आहे. ते माझ्या मृत्युसोबतच मनातून निघून जाईल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा