जितेंद्र आव्हाड बारावा खेळाडू

जितेंद्र आव्हाड बारावा खेळाडू

ईडीच्या लिस्टमधील बारावा खेळाडू राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड असल्याचा दावा भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे ईडीची पुढची नोटीस आव्हाडांना येणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

किरीट सोमय्या यांनी आज नाशिकमध्ये येऊन आधी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीची पाहणी केली. आवेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भुजबळांच्या मालमत्तेची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारले. ईडीच्या लिस्टमधील १२ वा खेळाडू कोण आहे? असा सवाल सोमय्यांना करण्यात आला. त्यावर लिस्टमधला १२वा खेळाडू जितेंद्र आव्हाड आहे, असं मोठं विधान सोमय्या यांनी केलं आहे. तसेच यावर अधिक बोलणं त्यांनी टाळलं. त्यांनी हसून उत्तर देणं टाळलं. त्यामुळे ईडीची पुढची नोटीस आव्हाडांना येणार आहे का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

यावेळी त्यांनी शिवसेनेच्या खासदार भावना गवळींवरही आणखी एक गंभीर आरोप केला. एका ट्रस्टचे महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेत रूपांतर करून ७० कोटी रुपयांची मालमत्ता आपल्या पीएच्या नावावर करण्यात आली. या ट्रस्टची महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेत रुपांतर करताना बोगस कागदपत्रे वापरण्यात आले. या प्रकरणाची चौकशी करण्याची आमची मागणी आहे, असं सोमय्या म्हणाले.

यावेळी त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांना आलेल्या ईडीच्या नोटिशीवरही प्रतिक्रिया दिली. परब यांच्याविरोधात मी पहिली तक्रार दिली होती. त्याची सुनावणी सुरू आहे. परब यांच्या मर्जीतील अधिकारी बजरंग खरमाटे यांचीही चौकशी सुरू आहे, असं सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनिल देशमुख यांना लपवून ठेवलं. आमदार प्रताप सरनाईक यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, असं सोमय्या म्हणाले.

हे ही वाचा:

तुम्ही आराम करा, काळजी घ्या, बाकीचं आम्ही बघतो

काश्मीरही काफ़िरांपासून ‘मुक्त’ करा

गौतम अदानींच्या संपत्तीत वाढ

टेस्लाची ‘ही’ चार मॉडेल्स भारतात

यावेळी सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जुन्या गोष्टीचं स्मरण करून दिलं. उद्धव ठाकरे यांनी भाजपासोबत असताना ईडीने केलेल्या कारवाईच कौतुक केलं होतं. मग आता भ्रष्ट नेत्यांना मंत्रिमंडळात कसं ठेवू शकता?, असा सवाल त्यांनी केला.

Exit mobile version