राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांची आता चांगलीच चीडचीड झाली आहे. औरंगजेबाबद्दल त्यांनी केलेल्या विधानानंतर त्यांच्यावर सातत्याने शाब्दिक हल्ले होऊ लागले आहेत. त्यातच त्यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना शब्दांत पकडण्याचा प्रयत्न केला. औरंगजेबजी असा शब्द बावनकुळे यांच्याकडून निघून गेल्याबद्दल त्यांनी बावनकुळे यांचा चंद्रपूर येथील दर्ग्याला दिलेल्या भेटीचा एक फोटो ट्विट केला. त्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हेदेखील होते. तो फोटो औरंगजेबाच्या कबरीचा असल्याचे त्यांनी म्हटले. त्यावरून त्यांच्यावर झोड उठली आणि मग त्यांनी तो फोटो डीलिट केला. सय्यद बहबतुल्ला यांच्या दर्ग्यातील तो फोटो होता.
हे ही वाचा:
योगी आदित्यनाथ यांच्या भेटीमुळे मविआ नेत्यांची पोटदुखी वाढली
अयोध्येत उभे राहणार ‘महाराष्ट्र भवन’
उत्तर भारतीय जनतेच्या द्वेषावर काँग्रेस फोफावली; आदित्यनाथांच्या भेटीवरून राजकारण
अजित पवार यांची वैचारिक उंची कळली
तो फोटो डीलिट केल्यानंतरही त्यांच्यावर सोशल मीडियात टीकेची झोड सुरूच राहिली. तेव्हा त्यावर त्यांनी म्हटले की, आम्ही दर्ग्या वर गेलो की आम्ही मुसलमान धार्जिणे मग जीतुदिन ,. मग हा हिंदु द्वेष्टा … मग टाकायचे घाणेरडे फोटो घाणेरड्या पोस्ट …औरंगजेबजी वरुन किती धावपळ .. आम्ही बोलो असतो तर बाप रे बाप .. मला माहीत आहे ती संतांची मझार आहे .. पण खोटे बोलून कसे खेळ करता येतात हेच दाखवायचे होते.
आम्ही दर्ग्या वर गेलो की आम्ही मुसलमान धार्जिणे मग जीतुदिन ,. मग हा हिंदु द्वेष्टा … मग टाकायचे घाणेरडे फोटो घाणेरड्या पोस्ट …औरंगजेबजी वरुण किती धावपळ .. आम्ही बोलो असतो तर बाप रे बाप .. मला माहीत आहे ती संतांची मझार आहे .. पण खोटे बोलून कसे खेळ करता येतात हेच दाखवायचे होते pic.twitter.com/oVWVRospgJ
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 5, 2023
औरंगजेब हा क्रूर नव्हता, असे विधान आव्हाड यांनी मध्यंतरी केले होते. त्यानंतर तो क्रूर होता, त्याने आपल्या भावांना मारले होते, असेही विधान त्यांनी केले. त्यामुळे त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका झाली. अजित पवार यांनी संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणू नका, असे विधान केल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आव्हाड यांनी औरंगजेब क्रूर नव्हता, असे विधान केले होते.