काँग्रेस नेते आणि नव्याने प्रदेशाध्यक्ष झालेले नाना पटोले यांनी सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना फटकारल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही या सुप्रसिद्ध अभिनेत्यांवर हल्ला केला आहे. “देशातील प्रश्नावर बोलण्याचा अक्षय कुमारला अधिकार नाही. तो कॅनडाचा नागरिक आहे. तर अमिताभ बच्चन काही देशाचा आदर्श नाहीत.” अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या दोन्ही अभिनेत्यावंर टीका केली.
“देशातील चित्रपट सृष्टीमध्ये सगळ्यात जास्त पैसा अक्षयकुमार कमावतो. तो परदेशी नागरिक आहे. अमिताभ बच्चन देशाचा आदर्श नाहीत. अक्षय कुमार देश चालवत नाही. अमिताभ बच्चन यांना मेमरी लॉस झाला आहे का?” असा उर्मट प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी विचारलाय. या लोकांनी राजकारणात हात घालायला नको, असं मतही आव्हाड यांनी व्यक्त केलं आहे. त्यांची राजकीय कोंडी झाली आहे. अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना लाचारी करावी लागते हे दुर्दैवं असल्याचंही आव्हाड यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा:
“अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारचे चित्रपट बंद पाडू” – नाना पटोले
“नाना पटोलेंचं अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या संदर्भातली विधान म्हणजे केवळ प्रसिद्धीसाठी आहे. एखाद्या मोठ्या अभिनेत्याबद्दल बोललं की दिवसभर प्रसिद्धी मिळते. म्हणजे बदनाम हुआ तो क्या हुआ नाम तो हुआ.” असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोलेंना लगावला.