मतांसाठी जितेंद्र आव्हाडांचे मुस्लिमांसमोर लोटांगण

मतांसाठी जितेंद्र आव्हाडांचे मुस्लिमांसमोर लोटांगण

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आपल्या विधानामुळे नेहमीच चर्चेत असतात. विशेष करून हिंदू, महापुरुषांच्या वक्तव्यावरून. ही वक्तव्ये केल्यानंतर महाराष्ट्रात कितीही आगडोंब माजला तरी ते आपल्या विधानावर ठाम असल्याचे दिसते. नुसते ठामचं नाही तर आपली भूमिका किती स्पष्ट आहे हे पण ते ठणकावून सांगतात. पण त्यांचा हाच ठामपणा मुस्लिमांचे लांगुलचालन करताना मात्र सोयीस्कररीत्या गळून पडतो हे दिसून आले आहे. आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी औरंगजेबाबद्दल विधाने केले आणि मुस्लिम समुदाय आणि आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांची नाराजी ओढवून घेतली. माफी मग नाहीतर निवडणुकीवर परिणाम होईल असा इशारा मिळताच आव्हाड खडबडून जागे झाले आणि माफी मागत लोटांगणकर्ते झाले आहेत. आव्हाडांच्या या भूमिकेबद्दल सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. अनेकांनी या संदर्भात ट्विटही केले आहे.

आता आव्हाड यांनी मुस्लिम समाजबद्दल काही दिवसांपूर्वी विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर मुस्लिम समाजात संताप व्यक्त करण्यात येत होता. ,या वक्तव्या बद्दल त्यांच्याच पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सय्यद अली अशरफ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आपल्या विधानाचे पडसाद लक्षात घेऊन आव्हाड यांनी मुस्लिम समाजाची माफी मागितली आहे.

औरंगजेबवरच्या वक्तव्यानंतर विरोधकंबरोबरच त्यांच्याच पक्षातले विरोधात उभे राहिले. माफी न मागितल्यास या विधानाचा आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीवर परिणाम होईल असा इशारा सय्यद अली अशरफ यांनी दिला होता. मुंब्रा विधानसभा मतदार संघ डोळ्यासमोर दिसताच आव्हाड यांनी नरमाईची भूमिका घेतली. औरंगजेबाचे नाव न घेता मी इतिहासासंदर्भात बोललो होतो. कुठल्याही धर्माबाबत कधीही बोलत नाही. मात्र, माझ्या वक्तव्याचा धर्माशी काही संबंध असेल तर ‘मैं सॉरी कह सकता हूं’ असा खुलासा आव्हाड यांना करावा लागला.

हे ही वाचा:

या २० देशांतील नागरिक करू शकतील भारतात UPI द्वारे व्यवहार.. जाणून घ्या तपशील

मनीष सिसोदिया यांच्या अडचणीत वाढ.. हेरगिरी प्रकरणी खटला चालवण्यास मंजुरी

एकनाथ शिंदे शिवसेनेचे प्रमुख आपला ठाकरे होणार नाही, याचे भान बाळगण्याची गरज!

आव्हाड यांनी अशी वक्तव्य करणे काही नवीन नाही. आव्हाड यांनी याआधी देशातील महापुरुष, शिवाजी महाराज यांच्याबद्दल अशीच वादग्रस्त विधाने केली होती. छत्रपती शिवाजी महाराज गोट्या खेळत होते का? अफजल खान शाहिस्तेखान नसता तर शिवाजी महाराजांचा इतिहास कळला असता का ? अशा प्रकारचे वादग्रस्त विधान करून त्यांनी वाद ओढवून घेतला होता.या वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यात अनेक ठिकाणी आक्रमक भूमिका घेण्यात आली होती. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकावर जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला होता. पण या सगळ्या प्रकरणावरून त्यांनी कधी माफी मागितली नव्हती. परंतु औरंगजेबावर केलेल्या वक्तव्याचा आपल्याला मुंब्रामध्ये फटका बसणार या भीतीने आव्हाड यांनी माफी मागितली असल्याचेच या वरून दिसते.

एकच गुन्हा औरंगजेब पुन्हा
जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाबद्दल भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी देखील ट्विट करून नाराजी व्यक्त केली आहे. ”मुघलांची औलाद… औरंगजेबाबद्दल कथित आक्षेपार्ह उद्गार काढल्यामुळे मुस्लिम समाज नाराज झालाय हे दिसल्याबरोबर… जितेंद्र आव्हाड यांनी मुसलमान समाजाची पटकन माफी मागून टाकली… याला म्हणतात राष्ट्रवादीची धर्मनिरपेक्षता… एकच गुन्हा औरंगजेब पुन्हा…” अस खोचक टोला आव्हाड यांना लगावला आहे.

 

Exit mobile version