25 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरराजकारणतिसऱ्या आघाडीसाठी जितनराम मांझी प्रयत्नशील? १९ जूनला निर्णय

तिसऱ्या आघाडीसाठी जितनराम मांझी प्रयत्नशील? १९ जूनला निर्णय

एनडीएमध्ये जाण्याचाही विचार, राज्यपालपदाची ऑफर येऊ शकते

Google News Follow

Related

बिहारचे माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी तिसरी आघाडी बनवण्यासाठी गंभीरपणे विचार करत आहेत. ते एनडीए, महाआघाडीसाठी पर्याय म्हणून तिसरी आघाडी उभारू शकतात. मात्र याची शक्यता खूप कमी दिसते आहे. गेल्या रविवारी मांझी यांचे पुत्र संतोष सुमन यांनी बिहारच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर मांझी यांनी महाआघाडी सोडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर त्यांचा पुढचा निर्णय काय असेल, हे ते १९ जून रोजी जाहीर करतील. त्या दिवशी त्यांनी हिंदुस्तान आवाम मोर्चाच्या (एचएएम) राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. ते एनडीमध्ये जाण्याऐवजी तिसरी आघाडी उभारण्याचा विचारही करत आहेत.

या बैठकीत ते महत्त्वाचा निर्णय घेऊ शकतात. एचएएमचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोषकुमार सुमन यांनी शुक्रवारी याबाबत माहिती दिली. या बैठकीत महाआघाडीला समर्थन देण्याचा निर्णय मागे घेतला जाईल. त्यानंतर राज्यपालांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा मागे घेत असल्याचे पत्र दिले जाईल. त्यांनी सांगितले की, आमच्यासमोर अनेक पर्याय आहेत. तिसऱ्या आघाडीबाबतही विचार सुरू आहे.

एनडीएमध्ये जाण्याचा विचार

मांझी हे एनडीए म्हणजेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. भाजपने मांझी यांना आगामी लोकसभा निवडणुकीत एक तिकीट देण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू आहे. त्या तिकिटावर संतोष सुमन लढू शकतात. तर, जितनराम मांझी यांना राज्यपालपदाचा प्रस्ताव दिला जाऊ शकतो. अर्थात याबाबत अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही.

हे ही वाचा:

शिक्षणतज्ज्ञ उभे राहिले एनसीईआरटीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाच्या पाठीशी

नाना पटोलेंविरोधातील काँग्रेसमधील तीव्र असंतोष काँग्रेसश्रेष्ठींना जाणवायला लागला आहे

मरीन ड्राईव्ह येथील वसतिगृहातील मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत

मदरशात शिक्षण घेण्यासाठी बिहारमधून आलेल्या मुलांना परत पाठवले!

दुसरीकडे, मांझी हे तिसऱ्या आघाडीवर गंभीरपणे चर्चा करत आहेत. एनडीए आणि महाआघाडीऐवजी तिसरा पर्याय तयार करू शकतात. अर्थात, याची शक्यता कमी वर्तवली जात आहे. भाजपला समर्थन देणारे सर्व पक्ष सध्या एनडीएमध्ये आहेत किंवा काही लवकरच यात सहभागी होऊ शकतात. तर, भाजपविरोधात सात पक्षांची आघाडी झाली आहे. त्यामुळे तिसऱ्या आघाडीत सध्या तरी तसा जोर दिसत नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा