मुंबई-पुण्यात ५जी च्या चाचणीला सुरवात

मुंबई-पुण्यात ५जी च्या चाचणीला सुरवात

रिलायन्स जिओने देशातील प्रमुख शहरांमध्ये ५जी नेटवर्कच्या चाचणीला सुरुवात केली आहे. यासाठी रिलायन्स जिओने जगातील बड्या कंपन्यांशी हातमिळवणी केली आहे. त्यानुसार सध्या मुंबईत रिलायन्स जिओ स्वत:च्या बळावर ५जी चाचण्या करत आहे. तर पुण्यात रिलायन्सकडून नोकिया कंपनीची मदत घेतली जात आहे. तर दिल्ली आणि गुजरातमध्ये जिओकडून अनुक्रमे एरिक्सन आणि सॅमसंगच्या मदतीने संयुक्तपणे ५जी नेटवर्कच्या चाचण्या सुरु आहेत.

याशिवाय, हैदराबादमध्येही रिलायन्स ५जी चाचणीसाठी तयारी करत आहे. मात्र, त्यासाठी तंत्रज्ञान भागीदार अद्याप निश्चित करण्यात आलेला नाही. देशात ५जी नेटवर्क व्यावसायिक स्वरुपात उपलब्ध करुन देण्यापूर्वी या चाचण्या रिलायन्स जिओसाठी अत्यंत महत्वपूर्ण मानल्या जात आहेत. यासाठी आणखी बराच अवधी लागणार आहे. कारण केंद्र सरकारने अजूनही ५जी नेटवर्कसाठी लागणारा परवाना आणि लहरींचा (स्पेक्ट्रम) लिलाव केलेला नाही.

सध्या रिलायन्स जिओकडून एमएम वेव्ह आणि मिड-बैंड स्पेक्ट्रमच्या माध्यमातून नेटवर्क आणि उपकरणांची चाचणी केली जात आहे. जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडने ५जी तंत्रज्ञान आणि प्राथमिक रचना तयार केली आहे. यामध्ये रेडिओ टेक्नॉलॉजी, मॅक्रो बेस स्टेशन, इनडोर सेल आणि कोर सॉफ्टवेअर नेटवर्कचा समावेश आहे.

हे ही वाचा :

‘रामायणातील सुमंत’ काळाच्या पडद्याआड

उल्हासनगर महापालिकेचे स्थायी समिती सभापतीपद भाजपाकडे

हमेल्सच्या स्वयंगोलच्या जीवावर फ्रान्स शिलेदार

कोल्हापूरात छत्रपती संभाजी राजेंच्या नेतृत्वात आंदोलन सुरु

रिलायन्स जिओपूर्वी भारती एअरटेलने गुडगावमध्ये ३५०० मेगाहर्ट्ज मिड-ब्रांड स्पेक्ट्रमच्या सहाय्याने ५जी टेस्टिंगला सुरुवात केली होती. दूरसंचार विभागाकडून एअरटेलला मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगळुरू आणि दिल्ली या भागांसाठी स्पेक्ट्रम वितरीत करण्यात आले होते. तर दुसरीकडे रिलायन्स जिओनेही ५७,१२३ कोटी रुपये खर्च करुन २२ सर्कलमध्ये स्पेक्ट्रम खरेदी केले आहेत. त्यामुळे आगामी काळात रिलायन्स जिओला ५जी  नेटवर्क पुरवण्यास मदत होणार आहे. याशिवाय, कनेक्टिव्हीटी सुधारण्यासाठी रिलायन्स जिओने महत्वाच्या सर्कलमध्ये जादा स्पेक्ट्रम विकत घेतले होते.

Exit mobile version