झारखंड विधानसभेत नमाजासाठी विशेष खोली

झारखंड विधानसभेत नमाजासाठी विशेष खोली

झारखंड राज्यात नव्या बांधण्यात विधानसभा इमारतीत नमाज पठणासाठी एक विशेष खोली आरक्षित करण्यात आली आहे. गुरुवार, २ सप्टेंबर २०२१ रोजी झारखंड सरकारने या संबंधीचे आदेश काढले असून विधान भवनातील टीडब्ल्यू ३४८ ही खोली नमाज पठणासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. झारखंड सरकारच्या या निर्णयावर चौफेर टीका होत असून एका विशिष्ट धर्माचे लांगूलचालन का केले जात आहे? असा सवाल विचारला जात आहे?

झारखंडमध्ये सध्या काँग्रेस प्रणित पुरोगामी लोकशाही आघाडीचे सरकार आहे. यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन हे मुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत. तर काँग्रेसदेखील सत्तेत सहभागी आहे. खरे तर भारतीय संविधान हे कोणत्याही सरकार कडून धर्मनिरपेक्ष असण्याची अपेक्षा करते. पण अशा प्रकारे विधिमंडळातच नमाज पठणासाठी एक विशिष्ट खोली तयार करण्यात आल्यामुळे धर्मनिरपेक्षतेच्या संविधानिक तत्त्वालाच सुरूंग लावण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

हे ही वाचा:

जावेद अख्तर यांचा चेहरा पुरोगामी असला तरी अंतरंग मात्र कट्टरवादीच

हरवलेली ‘ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती’ शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करा

पॅरालिम्पिकमध्ये आता ‘या’ खेळात सुवर्णपदकाची आशा

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची महिला सरपंचाला मारहाण

दरम्यान झारखंड सरकारच्या या निर्णयावर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पार्टीने चांगलाच आक्षेप नोंदविला दिसतो. भाजपा नेता बाबुलाल मरांडी यांनी सांगितले की ‘लोकशाहीचे मंदिर हे केवळ लोकशाहीचे मंदिरच राहिले पाहिजे’ झारखंड विधानसभेत नमज पठणासाठी वेगळ्या खोलीची सोय करणे चुकीचे आहे. आम्ही या निर्णयाच्या विरोधात आहोत.

तर झारखंड विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि भाजप नेते सी.पी सिंग यांनी म्हटले आहे की ‘मी नमाज खोलीच्या विरोधात नाही. पण मी ही त्याच प्रकारची मागणी करू इच्छितो की झारखंड विधानभवनात एक मंदिर उभारले जावे. महाबली हनुमानाचे मंदिर उभारण्याची मागणी मी करत आहे. जर विधानसभा अध्यक्षांनी मान्यता दिली तर स्वखर्चाने हे मंदिर उभारायची आमची तयारी आहे.’

Exit mobile version