झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच हेमंत सोरेन यांना कथित जमीन घोटाळा प्रकरणात रांची येथे ईडीकडून अटक करण्यात आली. त्यांनी रांची येथील राजभवनात आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर बुधवारी संध्याकाळी सक्तवसुली संचालनालयाने त्यांना अटक केली.
कथित जमीन घोटाळा प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोरेन यांची तब्बल सात तास चौकशी केली होती. त्यानंतर सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. भूमाफियांकडून मोठ्या प्रमाणात जमिनीचा मालकी हक्क बदलल्या गेल्याच्या रॅकेटशी संबंधित त्यांची चौकशी करण्यात आल्याचे ईडीकडून सांगण्यात आले.
हे ही वाचा:
चक्रव्यूहातून सुटकेचा फक्त आभास…
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ५८ आयपीएसच्या बदल्या
आठ महिन्यांनी चिनी कबुतराची पिंजऱ्यातून सुटका
हर्ष गायकरच्या खेळाने दिलीप वेंगसरकर प्रभावित!
हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्रिपदाचे मुख्य दावेदार, झारखंडचे मंत्री चम्पाई सोरेन यांनी राज्यपालांसमोर नव्याने सरकार स्थापनेचा दावा केला. तर, दुसरीकडे बुधवारी हेमंत सोरेन यांनी ईडी अधिकाऱ्यांविरोधात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली आहे.