झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा, काँग्रेसला झटका

झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा, काँग्रेसला झटका

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड मुक्ती मोर्चाने (झामुमो) राष्ट्रपतीपदासाठी एनडीए उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. झारखंडमध्ये झामुमो आणि काँग्रेसचे युतीचे सरकार असून पाठींबा जाहीर केल्यांनतर काँग्रेसला धक्का बसला आहे.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एका आदिवासी महिलेला राष्ट्रपती होण्याचा मान मिळणार असल्याचे सांगत झामुमोने पाठींबा जाहीर केला आहे. पक्षाचे अध्यक्ष दिशोम गुरू शिबू सोरेननी सर्व खासदार आणि आमदारांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मूजींच्या बाजूने मतदान करण्याचे निर्देश दिले आहेत. झामुमोच्या घोषणेनंतर काँग्रेसने झारखंड मुक्ती मोर्चासोबतच्या संबंधांवर चर्चा करण्यासाठी आज, १५ जुलैला रांचीमध्ये बैठक बोलावली आहे. यामध्ये राजकीय परिस्थितीवर चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

हे ही वाचा:

अधिकार पदावरील जिहादींवर कारवाई कधी?

संसाराचा त्याग करून भगवे झाले जितेंद्र नारायण त्यागी

संजय पांडेंविरोधात ईडीकडून गुन्हा दाखल

द्राैपदी मुर्मू यांचे मुंबईत जंगी स्वागत

झारखंड मुक्ती मोर्चाने काँग्रेसला धक्का देण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी राज्यसभा निवडणुकीत झारखंड मुक्ती मोर्चाने एकतर्फी निर्णय घेत आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर केले होते. तर काँग्रेसने त्या जागेवर आपला दावा सांगत होती परंतु, त्यांनतर सुद्धा त्यांची युती राहिली. झामुमोच्या द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर काँग्रेसने तात्काळ बैठक बोलावली आहे.

Exit mobile version