महिलांच्या प्रश्नांवर सतत आवाज उठवणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना फैलावर घेतले आहे. दारूबंदीच्या मुद्द्यावरून चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. सरकारमधील मंत्री जयंत पाटील यांचा विरोधी पक्षात असतानाच्या एका भाषणाचा व्हिडिओ चित्रा ताईंनी सोशल मीडियावर टाकत जयंत पाटलांना ‘क्या हुआ तेरा वादा’ असे म्हणत सवाल केला आहे.
गुरुवार, २७ मे रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारकडून चंद्रपूर मधील तळीरामांसासाठी एक खुशखबर जाहीर करण्यात आली. २०१५ पासून चंद्रपूर जिल्ह्यात लागू असलेली दारू बंदी उठवण्याचा निर्णय ठाकरे सरकारकडून घेण्यात आला आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा विरोध झुगारून हा दारूबंदी हटवण्याचा निर्णय सरकारने घेतला.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारमधील अनेक मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध
चंद्रपूरनंतर ‘या’ जिल्ह्यातील दारूबंदी उठवणार
गोपीचंद पडळकरांचा उद्धव ठाकरेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव
हॉस्पिटलचा धंदा चालावा म्हणून लस खरेदी केली नाही?
याच दारूबंदी हटवण्याच्या मुद्द्यावरून भाजपा महाराष्ट्र उपाध्यक्ष चित्रा वाघ आल्या दिवशी ठाकरे सरकारवर तोफ डागत आहेत. शनिवारी त्यांनी राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि ठाकरे सरकार मधील महत्त्वाचे मंत्री जयंत पाटील यांचा एक जुना व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला.
या व्हिडिओत जयंत पाटील हे असे सांगताना दिसत आहेत की ‘आमचे सरकार आले की कॅबिनेटमध्ये पहिला निर्णय यवतमाळमध्ये दारूबंदीचा घेतला जाईल.’ तसे आश्वासन त्यांनी यवतमाळमधील महिलांना दिले आहे. यावरूनच चित्रा वाघ यांनी ‘क्या हुआ तेरा वादा’ असा सवाल केला आहे. तर महिलांना कमी समजू नका अजूनही आमच्या भावनांशी असंच खेळत राहिलात तर तुम्हाला घरी बसून चुल फुंकायची वेळ येईल असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला आहे.
क्या हुवा तेरा वादा….जयंतराव जी
सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटला यवतमाळला दारूबंदी करणार…..इस आश्वासन का…
यवतमाळ राहिलं दूर..चंद्रपुरची दारूबंदी उठवली तुमच्या सरकारने
महिलांना कमी समजू नका अजूनही आमच्या भावनांशी असचं खेळत राहिलात तर तुम्हाला घरी बसून चुल फुंकायची वेळ येईल pic.twitter.com/okq3isGvmO
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 29, 2021