31 C
Mumbai
Tuesday, December 17, 2024
घरराजकारणजयंत पाटील म्हणतात, माझ्याविरोधात बातम्या पेरल्या!

जयंत पाटील म्हणतात, माझ्याविरोधात बातम्या पेरल्या!

अजित पवारांनंतर सत्तेत सहभागी होतील याची चर्चा

Google News Follow

Related

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील हे काही आमदारांसह अजित पवार यांच्यासोबत जातील असा दावा गेले काही दिवस केला जात होता. मुंबई दौऱ्यावर आलेल्या अमित शहा यांचीही त्यांनी भेट घेतल्याची चर्चा रंगली होती पण आपण शरद पवारांसोबत आहोत असे म्हणत पत्रकारांवरच जयंत पाटील उखडले. त्यांनी अजित पवारांसोबत जाणार असल्याचे दावे फेटाळले.

 

 

पत्रकारांना ते म्हणाले की, तुम्ही बातम्या चालवल्या. तुम्हाला काही पुरावे दिसले का? त्यावर करा बातम्या? नव्या बातम्या केल्यात एखाद्याच्या बद्दल गैरसमज पसरवता तर योग्य नाही. काहीतरी अभ्यास बातमी देणाऱ्यांनी केला पाहिजे.

 

 

सकाळपासून मनोरंजन आहे. मी अनिल देशमुख, राजेश टोपे मी असे चार पाच आमदार इथेच बसलो होतो. रात्री दीड वाजेपर्यंत मी कधी गेलो अमित शहांना भेटायला. हे संशोधन तुम्ही करा. तुम्ही चर्चा केल्यात त्याचे उत्तर तुम्ही द्या. तुम्हीच बातम्या देता. मी काही बोललोय का? कुणाला भेटलोय याचा पुरावा आहे का, परस्पर बातम्या केल्यात तर सामान्य कार्यकर्त्याच्या मनात गैरसमज पसरतो. तुम्हाला मी सांगेनच, तसे काही असेल तर. मी पवार साहेबांकडे सकाळी संध्याकाळी होतो. तुम्ही बातम्या पसरवत असाल तर तुम्हीच उत्तर दिले पाहिजे. जर तरचे प्रश्न आवश्यक आहे का. तुम्ही सांगत आहात हे जाणार, हे तिकडे जाणार, असेही ते म्हणाले.

 

एनआयएकडून पीएफआयच्या आणखी एकास अटक!

मुंबईच्या समुद्रात बोड बुडाली, दोनजण बेपत्ता

बाईकच्या शर्यतीत डोक्यावरील हेल्मेट पडले; १३ वर्षीय रेसरचा झाला मृत्यू

शह आणि मात की शह आणि माफ?

माझ्यासारख्या गरीबाला का विचारता?

भाजपाकडून असा दावा करण्यात येत आहे, असा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केल्यावर  जयंत पाटील म्हणाले की, अजित पवार भाजपा अशा बातम्या पेरतो असे मी म्हणणार नाही. तुम्ही बातम्या पेरता. ते कशाला पेरतील? चॅनेलवरच दाखवत आहेत. प्रसिद्ध ब्लॉगरने जयंत पाटील भुलले अशी बातमी चालविली. माझी प्रसिद्धी करत आहात हे चांगलेच आहे. जे चर्चा करतात त्यांना विचारा माझ्यासारख्या गरिबाला कशाला विचारता. न्यूज तुम्ही देता तर तुम्हीच खुलासा करा.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा