“जावेद अख्तर यांचा चेहरा पुरोगामी असला तरी अंतरंग मात्र कट्टरवादीच आहेत.” असं म्हणत भाजपा आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी गीतकार जावेद अख्तर यांचा समाचार घेतला आहे.
जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानशी केली असून, त्याचे समर्थन करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे म्हटले आहे. एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी संभाषण करताना अख्तर म्हणाले की, आरएसएस, विहिंप आणि बजरंग दल सारख्या संघटनांचेही तालिबान सारखेच उद्दिष्ट आहे. ते म्हणाले की, भारतीय संविधान त्याच्या ध्येयाच्या मार्गात येत आहे, परंतु जर संधी मिळाली तर ते या सीमा देखील ओलांडतील.
जावेद अख्तर यांचा चेहरा पुरोगामी असला तरी अंतरंग मात्र कट्टरवादीच आहेत. त्यांचे वक्तव्य म्हणजे निव्वळ बेशरमपणा @Javedakhtarjadu pic.twitter.com/cIiaWynqoV
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 4, 2021
जावेद अख्तर म्हणाले की, “ज्या पद्धतीने तालिबानी हे मुस्लिम राष्ट्र निर्माण करण्याचा प्रयत्न करतात त्या पद्धतीने आपल्याकडे काहीजण हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडतात. हे लोकही त्याच मानसिकतेचे आहेत. तालिबानी हिंसंक आहेत, रानटी आहेत पण आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांचे समर्थन करणारे लोकही त्याच मानसिकतेचे आहेत.”
हे ही वाचा:
हरवलेली ‘ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती’ शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करा
पॅरालिम्पिकमध्ये आता ‘या’ खेळात सुवर्णपदकाची आशा
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची महिला सरपंचाला मारहाण
भातखळकरांनी एक व्हिडिओ जारी करत जावेद अख्तर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “जावेद अख्तर यांचं हे विधान केवळ बेशरमपणाचा कळस नसून समस्त हिंदू समाजाचा अपमान आहे. जावेद अख्तर हे विसरतायत की या हिंदू बहुसंख्य असलेल्या देशात राहून ते तालिबानवर टीका करतायत. हिंमत असेल तर अफगाणिस्तानमध्ये जा आणि तालिबानवर टीका करा. जावेद अख्तर आपलं विधान मागे घ्या, हिंदू समाजाची क्षमा मागा. नाहीतर तुमच्या विरोधामध्ये बदनामीचा खटला दाखल केला जाईल.”