22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरदेश दुनियाजावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा

जावेद अख्तर हा कुंपणावरचा कावळा

Google News Follow

Related

लेखक, गीतकार जावेद अख्तर यांनी रा.स्व.संघ, विहिंप आणि बजरंग दलाबाबत गंभीर विधाने केली आहेत. या विधानांचे पोस्टमॉर्टेम करण्याची गरज आहे. वरकरणी अख्तर यांचे विधान तालिबानांच्या विरुद्ध आहे, असे वाटेल. परंतु ते काही खरे नाही. अख्तर यांचा इतिहास पाहिला तर त्यांना तालिबानांच्या नथीतून संघावर तीर मारायचे आहेत हे स्पष्ट दिसते.

काय म्हणाले जावेद अख्तर? ते म्हणतात, ‘तालिबान हे रानटी आहेत. देशात आरएसएस आणि विहिंपची मानसिकता तालिबानसारखी आहे.’ थोडक्यात संघ आणि विहिंपची मानसिकता रानटी आहे हे अख्तर यांना सुचवायचे आहे.

आपण जे बोलतोय ते सत्य नाही याची अख्तर यांना खात्री आहे. कारण हे सत्य असते तर त्यांची हे बोलण्याची हिंमत झाली नसती. हे बोलल्याबद्दल ते फक्त सोशल मीडियावर ट्रोल झाले नसते, गाढवावर बसून एव्हाना त्यांची धिंड काढण्यात आली असती.

अख्तर यांच्यासारख्या तथाकथित पुरोगाम्यांना संघाबाबत वाटणारा आकस समजून घेण्याची गरज आहे. या देशात संघ नसता तर काय झाले असते? मुस्लीम धार्जिण्या राज्यकर्त्यांच्या कृपेमुळे मुजोर झालेल्या कट्टरवाद्यांनी रोज हिंदूंना रक्तबंबाळ केले असते. टपल्या मारल्या असत्या. जिथे हिंदूत्व कमकुवत होते तिथे काय होते पाहा.

प.बंगालमध्ये दुर्गा पूजेवर बंदी लादण्यात आली. महाराष्ट्रात मोहरमचे जुलूस निघतायत आणि गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीवर बंदी आली आहे.

गेली सात दशके संघाच्या हजारो कार्यकर्त्यांनी केलेल्या तपश्चर्येमुळे देशात हिंदूंच्या हिताची काळजी घेणारा राजकीय प्रवाह बळकट झाला. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होऊ शकले.

डोक्याला गंध लावून गंगाआरती करणारा, राम मंदिराचा मार्ग प्रशस्त करणारा, देशोदेशीच्या राष्ट्राध्यक्षांना भगवद् गीतेची प्रत भेट देणारा पंतप्रधान देशाला मिळाला. देशात ताजमहाल आणि अजमेरच्या दर्ग्या पलिकडेही पाहाण्यासारखे काही आहे हे विदेशी नेत्यांना गंगेच्या तटावरचे दृश्य पाहून कळू लागले. मोदींच्या सरकारने ३७० ची कबर खणली. अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेशात मार खाणाऱ्या हिंदूंना देशात नागरीकत्व देणारा कायदा बनला.

आज हिंदू कधी नव्हे इतका संघटीत आहे, राजकीय दृष्ट्या सजग आहे. हे स्थित्यंतर प्रत्येक क्षेत्रात दृश्यमान झाले आहे. बॉलिवुड त्याला अपवाद नाही.

या देशात गेली अनेक वर्षे हिंदूंना सर्वधर्मसमभावाचे अफू देण्यात आले. सगळेच धर्म सारखे, ही हिंदूंना सातत्याने देण्यात येणारी आणखी एक गोळी. बॉलिवूडची भूमिका यात मोठी आहे. सत्तरच्या दशकात आणि त्यानंतर अमिताभ बच्चन यांचे जे काही सिनेमे सुपरहिट झाले, त्यात जावेद अख्तर आणि सलीम खान या जोडगोळीचा सिंहाचा वाटा आहे.

मंदिरात जाण्यासाठी नकार देणारा आणि मुस्लिमांसाठी पवित्र असलेल्या ७८६ बिल्ल्याचे चुंबन घेऊन तो कपाळाला लावणारा हिंदू नायक आपण त्यांच्या ‘दिवार’मध्ये पाहिला. त्यांच्या सिनेमात एक तरी पात्र गुणी, दयाळू मुस्लीम आहे. ‘जंजीर’मध्ये शेरखान, ‘शोले’मध्ये ईमाम साहाब, ‘दिवार’मध्ये रहीम चाचा, ‘शान’मध्ये अब्दुल ही यादी मोठी आहे. बॉलिवुडमध्ये हे लोक वर्षोनुवर्षे छुपा एजेंडा राबवत होते. हिंदू देवदेवतांची खिल्ली उडवणे, साधूंना भोंदू आणि नमाजींना मानवतावादी दाखवणे.

हिंदी सिनेमातला दहशतवादी कसा होता हो, काही वर्षांपूर्वी? सुभाष घईचा ‘कर्मा’ आठवतोय का? याच्या सिनेमात डॉ.डेंग नावाचा खलनायक आहे. याला दहशतवाद्यांचा म्होरक्या दाखवण्यात आले आहे. बॉलिवुडातील अख्तर प्रवृत्तींनी वास्तवापासून प्रेक्षकांना कोसो दूर ठेवले. मूर्ख बनवले.

खरे दहशतवादी दाढी आणि टोपीवाले असतात, जिहाद हाच त्यांचा मार्ग असतो हे दिसायला मणिरत्नमचा ‘रोझा’ येईपर्यंत वाट पाहावी लागली. बॉलिवुडला कधी छत्रपती शिवरायांबद्दल ममत्व वाटले नाही, अकबरावर इथे सिनेमा निघाला, चेंगीझ खानावरही सिनेमा आला. परंतु छत्रपतींवर सिनेमा काढण्याचे धाडस कुणी केले नाही. अफजल खानाचा कोथळा काढताना दाखवणे इथे कोणाला शक्य होते? आज बॉलिवुडने ‘तानाजी’पर्यंत मजल मारलेली आहे. उद्या छत्रपतींवर सिनेमा येणार हे निश्चित.

आज मुस्लीम दहशतवादावर उघड चर्चा होतेय, नक्षलवादावर सिनेमे बनतायत. काँग्रेसचे पितळ उघडे पाडणारे सिनेमे बनतायत. अख्तर यांच्यासारखे बेगडी पुरोगामी त्यामुळे अस्वस्थ झाले तर त्यात नवल काय?

देशात हिंदू बहुसंख्य असेपर्यंत अख्तर प्रवृत्ती पुरोगामी असतील, उद्या आकड्यांचे हे गणित बदलले तर हे शरीया डोक्यावर घेऊन नाचायला कमी करणार नाहीत.

कुंपणावरच्या या कावळ्यांना देशातील हिंदू संघटीतपणे उभा राहतोय, मानसिक गुलामी झुगारून देतोय याचा पोटशूळ आहे.

गंगा जमनी तेहजीब हे फक्त हिंदूना मूर्ख बनवण्याचे कारस्थान आहे. गंगा-जमनी तेहजीबचे तुणतुणे वाजवणारा मुस्लीमवादी शायर मुन्नवर राणा, त्याची शरीयावादी लेक अलिकडे हिंदुत्ववाद्यांबाबत ओकत असलेली गरळ ऐकली की आपल्याला गंगा-जमनी तेहजीबचा मुखवटा वेगाने गळून पडत असल्याचे लक्षात येते. राणाने भगवान वाल्मिकी आणि तालिबानांची तुलना केली होती. आता अख्तर संघ आणि तालिबानांची तुलना करीत आहेत. या देशात लोकशाहीच्या नावाखाली बोलण्याचेही स्वातंत्र्य आहे आणि भुंकण्याचेही. राणा असो वा अख्तर दोघांचा अंतस्थ हेतू हिंदूंचा अपमान करणे एवढाच असतो.

जावेद अख्तर पाकिस्तान आणि तालिबानच्या विरोधात बोलतात याचे अनेकांना कौतुक असते. राष्ट्रवाद्यांनी त्यांच्या या भूमिकेमुळे खूष होण्याची गरज नाही. फाळणीला, पाकिस्तानच्या निर्मितीला विरोध करणारे काही मुस्लीम नेते होते. परंतु त्यांनी पाकिस्तानला केलेला विरोध हिंदूच्या प्रेमातून केलेला नव्हता. भारताचा एखादा तुकडा तोडून घेण्यापेक्षा लोकसंख्या वाढवून पूर्ण हिंदूस्तान घशात घालण्याची त्यांची योजना होती.

आजही अशा मानसिकतेचे लोक भारतात आहेत. त्यांना देशात हिंदूंचे वर्चस्व नको आहे. हिरवा भारत हे त्यांचे स्वप्न आहे. हे षडयंत्र साळसूदपणे राबवता यावे म्हणून हिंदूंना सर्वधर्मसमभावाचे गूळ लावण्याचे काम ते करीत असतात. अख्तर त्यातलेच आहेत.

हे ही वाचा:

कोविड लसीचा तिसरा डोस घेणं गरजेचं?

भारताने गाठला परकीय चलन साठ्याचा उच्चांक

बोरिवलीत इमारतीच्या सातव्या मजल्यावर आग, जीवितहानी टळली 

गौहत्या करणाऱ्या जावेदला इलाहाबाद उच्च न्यायालयाने फटकारले

कुंपणावरच्या या कावळ्यांना ओळखण्याची गरज आहे. त्यांचे मुखवटे ओरबाडून काढण्याची गरज आहे. हिंदूंच्या पराक्रमाने या देशात मुघली साम्राज्याची कबर खणली हे अख्तर यांनी समजून घ्यावे. त्यांनी लेखणी खरडून पोट भरावे आणि उरलेले दिवस शांतपणे काढावे एवढेच आमचे सांगणे आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा