राज्यामध्ये सध्या क्रूझवरील ड्रग्ज प्रकरण चांगलेच गाजत आहे. असे असताना एकीकडे महाविकास आघाडी मात्र ड्रग्जविरोधात धरपकड करत असलेल्या यंत्रणांवर गालबोट लावत आहे. एनसीबीने केलेल्या कारवाईवर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी माध्यमांसमोर उपस्थित राहून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळेच आता महाविकास आघाडीचा एकूणच कल हा ड्रग्ज घेणारे आहेत त्यांच्या बाजूने असल्याचे स्पष्टपणे लक्षात येत आहे. नुकताच मलिक यांनी समीर वानखेडे तसेच त्यांची बहिण जास्मिन वानखेडे यांच्यावर आरोप केले. या आरोपावर आता बोलण्यासाठी मनसे पुढे सरसावली आहे. या आरोपांना मनसेने त्यांच्याच स्टाइलने प्रत्युत्तर दिले आहे. मनसे जास्मिन वानखेडे यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचंही यावेळी अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.
अमेय खोपकर यांनी म्हटलं की, जास्मिन वानखेडे मनसे चित्रपट सेनेसाठी उत्तम काम करत आहेत. त्यांचा आणि एनसीबीचा काडीमात्र संबंध नाही. तसेच समीर वानखेडे आणि मनसे यांचाही एकमेकांशी काहीच संबंध नाही. नवाब मलिक केवळ त्यांचा जावई जेलमध्ये होता यावरून आमच्या पदाधिकाऱ्यांवर का काढताय? असा सवाल आता खोपकर यांनी उपस्थित केलेला आहे.
हे ही वाचा:
पवारांच्या शागिर्दाने १५ हजार कोटी रुपये लुटले
सोशल मीडियामध्ये येणार नवे ‘ट्रम्प’कार्ड
आंदोलकांना रस्ते अडवण्याचा अधिकार नाही
केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून मोठी भेट
जास्मिन वानखेडे यांच्यावर केलेले आरोप धादांत खोटे आहे असे म्हणत मनसेने खुला पाठिंबा दर्शविला आहे. राज्यामध्ये मुंबई पोलीस आणि एनसीबी जे काम ड्रग्ज संदर्भात करत आहे, ते अत्यंत काम अभिमानास्पद आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
सध्याच्या घडीला महाविकास आघाडीचे अनेक वाचाळवीर नेते एनसीबीच्या कारवाईच्या विरोधात भूमिका घेताना उघडपणे दिसत आहे. त्यामुळे राज्यातील हा ड्रग्जचा वाद आता नीतीमत्तेच्या मुद्द्यापेक्षा राजकीय कुरघोडीचा मुद्दा झालेला आहे.