“जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीची कारवाई हे हिमनगाचे टोक आहे. हा विषय जरंडेश्वरपुरता मर्यादित नाही. मी याबाबत गृहमंत्री अमित शाहांना पत्र लिहितोय, लिलावात विकल्या गेलेल्या सर्व कारखान्यांची चौकशी करण्याची मागणी करणार आहे”, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते पुण्यात बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नातेवाईक असलेल्या राजेंद्र घाडगे यांच्या साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीने कारवाई केली आहे. जरंडेश्वर शुगर्स या कारखान्याची तब्बल ६६ कोटी रुपयांची मालमत्ता सील करण्याचे आदेश ईडीकडून देण्यात आले आहेत.याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, “मी कोणाला धमकी देत नाही, पण हा विषय जरंडेश्वरपुरता मर्यादित नाही. एक एक नाव समोर येईल. लिलावात विकल्या गेलेल्या सर्व कारखान्यांची चौकशी करावी. त्याबाबत मी गृहमंत्री अमित शाहांना पत्र लिहितोय.”
जरेंडेश्वर सहकारी साखर कारखाना हा सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथे आहे. सध्याच्या मालकांनी हा कारखाना २०१० सालात ६५ कोटी ७५ लाख रुपयांना खरेदी केला होता. हा कारखाना सध्या मेसर्स गुरू कमोडिटी सर्विसेस प्रा. लि यांच्या मालकीचा आहे. हा कारखाना मेसर्स जरेंडेश्वर शुगर मिल प्रा लिमिटेडला भाड्याने देण्यात आला आहे. मेसर्स जरडेश्वर प्रा लिमिटेड कंपनीत मेसर्स सपार्किंग सोईल प्रा लिमिटेड कंपनी ही भागीदार कंपनी आहे. ईडीने केलेल्या तपासात मेसर्स स्पार्कलिंग कंपनी ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित आहे.
हे ही वाचा:
व्हीप बजावल्यानंतरही आमदारांना थेट फोन करण्याची वेळ का आली?
जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात सुनावणी ६ जुलैला
सरकार पाडण्याशी काहीही घेणंदेणं नाही, निवडणुकीची तयारी सुरू
जरांडेश्वर सहकारी साखर कारखान्याची २०१० सालात विक्री करण्यात आली होती.यावेळी तो मूळ किमतीच्या कमी किमतीत विकण्यात आल्याचा आरोप आहे. त्याचप्रमाणे त्याची कार्यपद्धती योग्यपणे पाळण्यात आली नव्हती. याच काळात अजित पवार हे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर होते. याच काळात हा कारखाना मेसर्स गुरू कमोडिटी सर्विसेस प्रा लिमिटेड ला विकण्यात आला. त्यानंतर तात्काळ हा कारखाना जरंडेश्वर शुगर मिल प्रा लि ला भाडे तत्वावर देण्यात आला. या जरंडेश्वर शुगर मिल्स प्रा ली मध्ये मोठ्या प्रमाणात संपार्किंलीग सोईल प्रा ली. कंपनीचा हिस्सा आहे. ही कंपनी अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या मालकीची आहे.