जात धर्म अन गोत्र सोडुनी बनली जनाब सेना

जात धर्म अन गोत्र सोडुनी बनली जनाब सेना

शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केल्यापासून त्यांना हिंदुत्वाचा विसर पडला आहे. या मुद्द्यावरून राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेली भारतीय जनता पार्टी कायमच शिवसानेवर निशाणा साधत असते. अशाच एका घटनेवरून भाजपाने शिवसेनेला फैलावर घेतले आहे. भाजपा महाराष्ट्रच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ‘जात धर्म अन गोत्र सोडुनी बनली जनाब सेना’ असे ट्विट करत भाजपाने शिवसेनेला चपराक लगावली आहे. नाशिकमध्ये घडलेल्या एका घटनेवरून हे ट्विट करण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?

सध्या देशभर गाजत असलेल्या काश्मिर फाईल्स या चित्रपटाला महाराष्ट्रातूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पण महाराष्ट्रातील नाशिक येथे घडलेल्या एका घटनेत भगवी शाल पांघरून काश्मिर फाईल्स चित्रपट पहायला गेलेल्या महिलांना अडवण्यात आले आहे. भगवी शाल घालून त्यांना चित्रपटगृहात जाऊ दिले नाही. त्यांना चित्रपटगृहाबाहेर शाल उतरवायला लावली आणि मगच चित्रपटगृहात सोडण्यात आले.

या घटनेवरूनच भाजापा महाराष्ट्र आक्रमक झाला असून त्यांनी अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत या घटनेचा निषेध केला आहे. तर याचवेळी हेच का तुमचे हिंदुत्व असा सवाल करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

“हिरवे तुमचे रक्त तळपते, लुप्त हिंदुत्व बाणा, जात धर्म अन गोत्र सोडुनी बनली जनाब सेना

नाशिक मध्ये, चित्रपटगृहात भगवी शॉल घालून ‘द कश्मीर फाईल’ पाहण्यासाठी जाणाऱ्या महिलांना पोलिसांनी रोखलं! चित्रपटगृहाच्या गेटवर शॉल उतरवून घेण्यात आल्या.

उद्धव ठाकरेजी हेच हिंदुत्व तुमचं?” असे ट्विट भाजपा महाराष्ट्रने केले आहे.

Exit mobile version