‘जनाब बाळासाहेब’….सत्तेसाठी शिवसेनसेची पुन्हा लाचारी

‘जनाब बाळासाहेब’….सत्तेसाठी शिवसेनसेची पुन्हा लाचारी


हिंदुत्वाच्या डरकाळ्या मारणाऱ्या शिवसेनेचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. शिवसेना पुरस्कृत शिवशाही या संस्थेने छापलेल्या नूतन वर्षाच्या दिनदर्शिकेत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख ‘जनाब बाळासाहेब ठाकरे’ असा करण्यात आला आहे. आयुष्यभर ‘हिंदुहृदयसम्राट’ ही बिरुदावली अभिमानाने मिरवलेल्या बाळासाहेबांचे ‘जनाब बाळासाहेब’ कसे झाले? असा सवाल महाराष्ट्राला पडला आहे.

स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या सेनेने सत्तेची मलाई खाण्यासाठी आजवर हिंदुत्वाचा केव्हाच त्याग केला होता. राम मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन करताना सेनेने पण ‘दाढी कुरवाळण्याचे’ अनेक प्रकार केले. याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्या अस्लम शेखला उद्धव ठाकरेंनी मंत्री केले तर त्यांच्या चेल्यांनी थेट ‘अजान’ स्पर्धा आयोजित केली होती. पण आता थेट शिवसेनाप्रमुखांच्याच नावामागची बिरुदावली हटवून त्यांना ‘जनाब’ करून शिवसेनेने आपण किती ‘सेक्युलर’ आहोत हे दाखवून दिले आहे.

औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव करण्याच्या गप्पा मारणाऱ्या शिवसेनेने आपल्या वडिलांच्या बिरुदाचेच नामांतर केले असून हा शिवसेनेचा वैचारिक सुंता आहे आरोप विरोधकांमार्फत करण्यात आला आहे.  

Exit mobile version