‘जनआर्शीवाद यात्रेने विरोधकांचे धाबे दणाणले’

‘जनआर्शीवाद यात्रेने विरोधकांचे धाबे दणाणले’

भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी जनआशीर्वाद यात्रेसंदर्भात नुकतेच भाष्य केले. ते म्हणाले की, जनआशीर्वाद यात्रा अत्यंत यशस्वी झालेली आहे. या जन आशीर्वाद यात्रेसाठी ३९ नवीन केंद्रीय मंत्र्यांना जनतेचे भरभरून प्रेम मिळाले आहे. त्यामुळेच आता विरोधक घाबरले आहेत. त्यांनी थेट नाव न घेता महाराष्ट्रातील जनआर्शीवाद यात्रेच्या वेळी झालेल्या वादंगाचाही उल्लेख केला. याप्रसंगी नड्डा म्हणाले, जनता मोदी सरकारवर अतूट पाठिंबा आणि विश्वास दाखवत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबाबत घडलेल्या घटनेवरही त्यांनी भाष्य केले. महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधत नड्डा म्हणाले, “नरेंद्र मोदी सरकारवर लोकांनी दाखवलेल्या भक्कम पाठिंब्याला आणि विश्वासाला धक्का लावण्यात, काही नाटकी लोकांना मात्र अपयश आलेले आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना अटक केली होती. नड्डा म्हणाले, “हा लोकशाही व्यवस्थेवर थेट हल्ला आहे. परंतु जनतेच्या पाठिंब्यामुळे मात्र विरोधकांचे राजकारण फार शिजले नाही, अखेर त्यांना माघार घ्यावीच लागली.

हे ही वाचा:

कुटुंबाला मिळाली अपघाताची नुकसान भरपाई तब्बल पाच वर्षांनी!

भागीदाराच्याच खुनाचा कट रचल्याप्रकरणी अटक!

तरुणीच्या हातून मोबाईल हिसकावून तो पळाला खरा, पण…

सुनील यादव यांच्या रूपातील अजातशत्रू जननेता गमावला

देशभरातील सर्व भागांमध्ये अत्यंत यशस्वी पद्धतीने ‘जन आशीर्वाद यात्रा’ पार पडली. यामुळे आता विरोधी पक्ष चांगलाच हलला आहे. ते म्हणाले, स्वातंत्र्यदिनी सुरू झालेल्या आणि 28 ऑगस्टपर्यंत चाललेल्या या यात्रेने १४ दिवसात २४००० किमी पेक्षा जास्त अंतर पार केले. यामध्ये ५००० पेक्षा जास्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हे सर्व कार्यक्रम अत्यंत यशस्वी होते. जनतेने कायमच मोदी सरकारच्या सर्वांगीण विकास आणि प्रगतीचे कौतुक केले आहे. समाजकल्याण आणि आर्थिक कल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार भाजपाने केला आहे. पत्रकार परिषदेत, भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी मोदी आणि नड्डा यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत ही यात्रा त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी झाली, असे सांगितले.

Exit mobile version