केंद्रीय मंत्र्यांची आजपासून ‘जन आशीर्वाद’ यात्रा

केंद्रीय मंत्र्यांची आजपासून ‘जन आशीर्वाद’ यात्रा

केंद्रीय मंत्री मंडळाचा विस्तार झाल्यामुळे महाराष्ट्रातील चार खासदारांची केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागली होती. महाराष्ट्रातील हे मंत्री आज राज्यात येणार असून त्यांच्या आशीर्वाद यात्रेला सुरूवात होणार आहे.

या यात्रेसाठी हे मंत्री पदभार स्विकारल्यानंतर पहिल्यांदाच राज्यात येत आहेत. मुंबई विमानतळावर त्यांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. चारपैकी खासदार कपील पाटील, डॅाक्टर भारती पवार, डॅाक्टर भागवत कऱ्हाड हे आजपासून या यात्रेस सुरूवात करत आहे.

केंद्रीय सुक्ष्म लघू उद्योग मंत्री नारायण राणे मात्र १९ ॲागस्टपासून मुंबईतून या यात्रेची सुरूवात करणार आहेत. ५६० किमीचा प्रवास हे मंत्री या यात्रेतून करणार असून राज्यातील आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेऊन ही यात्रा केली जात आहे. त्यात मराठवाडा, कोकण प्रांत पूर्णपणे पिंजून काढला जाणार आहे.

हे ही वाचा:

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींचे तिसरे पुण्यस्मरण

हुश्श…पुजारा, रहाणेला सूर गवसला

पवनदीप झाला इंडियन आयडल

भारताच्या स्वातंत्र्य दिनी लंडनमध्ये मोदी विरोधाची उचकी

अशी असेल नारायण राणेंची जन आशीर्वाद यात्रा

१९ आणि २० ऑगस्ट असे दोन ही यात्रा मुंबईत असेल.

२१ ऑगस्टला वसई- विरार

२३ ऑगस्टला दक्षिण रायगड

२४ ऑगस्टला चिपळूण

२५ ऑगस्टला रत्नागिरी

२६ ऑगस्टला सिंधुदुर्ग

१९ ते २६ असा या जन आशीर्वाद यात्रेचा कालावधी असणार आहे. मुंबईहून सुरु होणाऱ्या या यात्रेचा सिंधुदुर्ग येथे समारोप होईल.

आज केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेला ठाणे शहरातील आनंदनगर चेकनाक्याहून सुरूवात होणार आहे. ५ व्या दिवशी २० ऑगस्टला भिवंडी तालुक्यात त्यांच्या यात्रेची सांगता होईल.

या यात्रेदरम्यान कळवा, मुंब्रा, डोंबिवली, कल्याण पूर्व, अलिबाग, रेवदंडा, पेण, पनवेल, उरण, नवी मुंबई, कल्याण शहर, शहाड, टिटवाळा, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मुरबाड, किनवली, शहापूर आदी विविध भागातून यात्रा काढली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Exit mobile version