‘मोदी पंतप्रधान झाले आणि जम्मू-काश्मिरची स्थिती सुधारली’

‘मोदी पंतप्रधान झाले आणि जम्मू-काश्मिरची स्थिती सुधारली’

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज जम्मूमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ८३ व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर जम्मू-काश्मीरची स्थिती अनेक पटीने सुधारली असल्याचे शाह म्हणाले आहेत. या कार्यक्रमानंतर अमित शाह जम्मू-काश्मीरच्या सुरक्षा आढावा बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीला जम्मूमध्ये तैनात असलेल्या निमलष्करी दलाचे प्रमुख, यूटी पोलिस आणि सुरक्षा संस्थांचे प्रमुखही उपस्थित राहणार आहेत.

जम्मूच्या एमए स्टेडियममध्ये झालेल्या कार्यक्रमापूर्वी सीआरपीएफच्या जवानांनी अमित शहा यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. त्यानंतर कार्यक्रमाला संबोधित करताना शाह म्हणाले की, ” २०१४ मध्ये नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सुधारली आहे. जम्मू काश्मीरमध्ये लोकशाही टिकवून ठेवण्यात मोदी सरकारला मोठे यश मिळाले. जम्मू-काश्मीरमधील सर्वात मोठे यश म्हणजे आपल्या सैन्याने दहशतवादावर नियंत्रण मिळवले आहे. मोदी सरकारने ३७० कलम रद्द केल्यापासून जम्मू काश्मीरची परिस्थिती दिवसेंदिवस सुधारत चालली आहे. ”

केंद्रीय राखीव पोलीस दलाबद्दल बोलताना शाह म्हणाले, ” भारत सरकारने निर्णय घेतला आहे की सर्व सीआरपीएफची वार्षिक परेड येथून पुढे देशाच्या विविध भागात साजरी करण्यात येणार आहे. सीआरपीएफच्या संघटनांनी देशाच्या वेगवेगळ्या भागात जाऊन देशातील जनतेशी नाते निर्माण केले पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे. सीआरपीएफ दीर्घ काळापासून भारतातील लोकांना सुरक्षा देत आहे. देशात निवडणुका एखाद्या उत्सवासारख्या असतात. यावेळी या सीआरपीएफ संघटना देशभरात शांतततेने मतदान व्हावे यासाठी खबरदारी घेतात.”

हे ही वाचा:

“शिवसेनेने ‘जनाब बाळासाहेब ठाकरे’ यांना स्वीकारले आहे”

योगी आदित्यनाथ या दिवशी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

‘औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकणारे महाराष्ट्राचे नेते होऊ शकत नाहीत’

‘हिजाब घालायला द्या तरच परीक्षा देऊ’

दरम्यान हा कार्यक्रम पार पडल्यांनंतर अमित शाह जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाला आळा घालण्यात गुंतलेल्या सुरक्षा यंत्रणांचीही बैठक घेणार आहेत.

Exit mobile version