जम्मू- काश्मीर: १० वर्षांनी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात

पहिल्या टप्प्यात ९० पैकी २४ जागांसाठी मतदान

जम्मू- काश्मीर: १० वर्षांनी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात

जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. १० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमधील जनता मुख्यमंत्री निवडण्यासाठी मतदान करत आहे. त्यामुळे जनतेचा कौल कोणाला असणार आहे याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. ९० पैकी २४ जागांसाठी बुधवार, १८ सप्टेंबर रोजी मतदान होणार असून त्यापैकी १६ जागा काश्मीर खोऱ्यात तर आठ जागा जम्मू विभागात आहेत.

जम्मू- काश्मीरमध्ये दहा वर्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत असून पहिल्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात सात जिल्ह्यांतील २४ जागांवर सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये एकूण ९० जागा आहेत. त्यापैकी ४७ खोऱ्यात आणि ४३ जागा जम्मू विभागात आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी २५ सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरला तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल ८ ऑक्टोबरला जाहीर होणार आहे.

जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभा निवडणुका तब्बल १० वर्षांनी आणि कलम ३७० रद्द केल्यानंतर प्रथमच होत आहेत. चार महिन्यांपूर्वी लोकसभेच्या निवडणुका शांततेत पार पडल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठीही शांततेत मतदान होण्याची अपेक्षा आहे. यासाठी सुरक्षा दल सज्ज असून कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

सनातन धर्म…पुस्तकाची कहाणी पॉडकास्टच्या रूपात लवकरच येणार समोर, टीझर जारी

भारताने पाचव्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली, चीनला केले पराभूत !

काँग्रेसची इकोसिस्टम खवळली, ‘सत्तेसाठी भुकेलेल्यांना गणेश पूजेची समस्या’

अल्पसंख्यांकांवरून भारतावर टिपण्णी करण्यापूर्वी इराणने स्वतःचे रेकॉर्ड्स बघावेत

लोकांना मतदान करण्याचे आवाहन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान सुरू होत असताना मी सर्व मतदारसंघातील लोकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आणि लोकशाहीचा उत्सव अधिक मजबूत करण्याचे आवाहन करतो. मी विशेषतः तरुण आणि प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

Exit mobile version