महाराष्ट्रात सध्या जेम्स लेनचे प्रकरण गाजत आहे. पण दस्तुरखुद्द जेम्स लेनने इंडिया टुडेचे पत्रकार किरण तारे यांना पाठवलेल्या मेलमधून हे सारे प्रकरण स्पष्ट केले असून आपण बाबासाहेब पुरंदरेंशी कधीही संवाद केला नाही, भेटलो नाही, असे जेम्स लेनने म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणात खोटे बोलणाऱ्यांचा पुरता पर्दाफाश झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरेंनी जेम्स लेनचे कौतुक केले होते असा उल्लेख करून महाराष्ट्रभूषण पुरंदरेंना लेनशी जोडण्याचा प्रयत्न केला होता, तो त्यांचा दावाही पुरता निकाली निघाला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्याच्या तसेच गुढीपाडव्याला शिवतीर्थावर झालेल्या सभेत बाबासाहेब पुरंदरे यांना लक्ष्य करणाऱ्यांना सुनावण्यात आल्यावर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले. पण आता स्वतः जेम्स लेन याने खुलासा केल्यामुळे बाबासाहेब पुरंदरेंवर लेनच्या पुस्तकावरून अत्यंत खालच्या भाषेत टीका करणाऱ्यांची तोंडे बंद होणार का, हे स्पष्ट व्हायचे आहे.
जेम्स लेन याने या मेलमध्ये म्हटले आहे की, मला जो प्रश्न विचारण्यात आला तोच मुळात चुकीचा आहे की, पुस्तकातील आक्षेपार्ह माहिती मला कुणी दिली? मला अशी कोणतीही माहिती कुणीही दिलेली नाही. हे पुस्तक विविध गोष्टी आणि लोकांनी त्या कशा उद्धृत केल्या त्यासंदर्भातील आहे. काही लोक शिवाजी महाराजांबद्दलच्या गोष्टी या समर्थ रामदासांशी जोडतात तर काही तुकारामाशी. यापैकी कुणाची माहिती योग्य आहे यात मला रस नाही. एखादी व्यक्ती अ नावाचे नॅरेटिव्ह का योग्य मानते किंवा दुसरा गट ब नॅरेटिव्ह का योग्य मानते हे मला माहीत नाही.
हे ही वाचा:
‘राज ठाकरे घेणार उद्धव ठाकरेंची जागा’
शिवसेना कार्यकर्त्यांची आमदार रवी राणांना शिवीगाळ
पीएफआयचा मुंब्रा अध्यक्ष अब्दुल मतीन शेखानी फरार
लेन म्हणतो की, तुम्ही माझे हे पुस्तक वाचाल तर तुम्हाला लक्षात येईल की, मी यात कोणताही ऐतिहासिक दावा केलेला नाही. जे म्हणतात की मी शिवाजी महाराजांचा अपमान केला त्यांनी माझ्या लिखाणाचा चुकीचा अर्थ काढलेला आहे. मी ऐतिहासिक तथ्यांबद्दल पुस्तकात लिहिलेले नाही. केवळ ज्या गोष्टी ऐकलेल्या आहेत त्याबद्दल लिहिले आहे.
लेन हे कबूल करतो की, मी जो काही युक्तिवाद केला आहे तो करताना मी योग्य ती काळजी घेतली नाही. त्यामुळे इतरांना त्याचा त्रास सहन करावा लागला. लेनने बाबासाहेब पुरंदरेंबाबत म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या कथांचा पुरस्कार, प्रचार करणारे एक महत्त्वाचे व्यक्ती आहेत. पण १८ व १९व्या शतकातील राजकारणामुळे ते टीकेचे लक्ष्य बनले आहेत.
लेन म्हणतो की, छत्रपती शिवाजी महाराजा हे महान होते पण दुर्दैवाने त्यांचे चरित्र हे अभ्यासक्रमाचा, पाठ्यवृत्तीचा भाग न बनता राजकीय वादविवादांचा विषय बनले.