जालना नगरपालिका आता महानगरपालिका

जालनामधील नागरिकांना राज्य सरकारचा मोठा दिलासा

जालना नगरपालिका आता महानगरपालिका

जालनामधील नागरिकांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जालना नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत करावे अशी मागणी केली जात होती. जालना नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर करण्यात आले आहे.

नगर विकास उपसचिवांनी यासंबंधी अधिसूचना जारी केली आहे. तसेच नगरपालिकेची महानगरपालिका करताना तुर्तास हद्दवाढ न करण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला आहे.

राज्यात शिंदे- फडणवीस सरकार येताच राज्याच्या उपसचिव विद्या हपय्या यांनी जालना जिल्हाधिकारी यांना नगरपालिकांचे रूपांतर महानगरपालिकेत करण्यासाठीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी जालना पालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत करण्यासाठी पाठपुरावा केला होता.

हे ही वाचा:

‘गो फर्स्ट’च्या ५५ विमानांकडे एअर इंडिया, इंडिगोचे लक्ष

भारतातील ४२,००० कुशल कामगारांना इस्त्रायलमध्ये नोकरीच्या संधी

आता परदेशातील प्रेक्षकही बघणार ‘द केरला स्टोरी’

पैनगंगा नदीच्या पुलावरून ट्रॅव्हल्स कोसळून भीषण अपघात

जालना पालिकेने महापालिकेचा ठराव पाठवावा, तत्काळ महापालिकेला मंजुरी देता येईल, असे आदेश तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२१ मध्ये जालन्याचा आढावा घेताना दिले होते. लोकसंख्या, शहराच्या वाढलेल्या विस्तारामुळे शहर महापालिका होण्यासाठीच्या निकषात बसत होते. जालना नगर परिषद ही जालना शहरातील समस्या निराकरण करण्यास असमर्थ असल्याच्या तक्रारी नागरिकांच्या होत्या. पाणीपुरवठा, पथदिवे, रस्ते सुविधा आदी मूलभूत समस्या सोडवण्यासाठी जालना नगर परिषद अयशस्वी ठरत असल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचा मुद्दा अनेक संघटनांकडून उपस्थित केला जात होता. त्यानंतर राज्य सरकारने हा दिलासादायक निर्णय घेतला आहे.

Exit mobile version