27 C
Mumbai
Sunday, January 5, 2025
घरराजकारण३ हजार वाहने, १२ हजारांचा जमाव घेऊन जलील आलेच कसे? चौकशी करा!

३ हजार वाहने, १२ हजारांचा जमाव घेऊन जलील आलेच कसे? चौकशी करा!

भाजपा नेते किरीट सोमय्या यांची मागणी

Google News Follow

Related

मुंबईतील धारावीमध्ये शनिवारी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. धारावीमधील मेहबुब ए सुभानिया मशिदीचा अनधिकृत भाग पाडण्यासाठी गेलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. शेकडोंचा जमाव रस्त्यावर उतरला होता आणि यामुळे तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी धारावीमधील परिस्थितीला वर्षा गायकवाड आणि उद्धव ठाकरे यांना जबाबदार धरले आहे. यानंतर किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी पुन्हा आरोप केले आहेत.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी बुधवार, २५ सप्टेंबर रोजी धारावीमधील मशिदीचा अनधिकृत भाग पाडण्याची घटना आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आलेली एआयएमआयएम रॅली या दोन्ही घटनांबाबत गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रात मुस्लिम समाजाला भडकवण्याचा कट रचला जात असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. एएनआयने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

धारावीमधील मेहबुब ए सुभानिया मशिदीचा भाग पाडण्यासंदर्भात १० लाखांहून अधिक आवाहने प्रसारित करण्यात आली होती, तसेच व्हॉईस मेल देखील प्रसारित करण्यात आले होते. सोशल मीडियावर लाखो संदेश व्हायरल करण्यात आले होते. शिवाय विविध ठिकाणी पत्रेही पाठवण्यात आली होती. त्याचवेळी एआयएमआयएमचे इम्तियाज जलील मुंबईत पोहचले. तीन हजार वाहने आणि १२ हजार लोक होते. यामागे कोण आहे? असा संतप्त सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.

व्हायरल झालेली माहिती एका काँग्रेस नेत्याच्या मोबाईलवरून फॉरवर्ड करण्यात आली होती. पाकिस्तानच्या आयएसआय लिंक्सच्या देणग्या असलेली अनेक वाहने रॅलीमध्ये होती. उपमुख्यमंत्र्यांना यासंबंधीची सर्व कागदपत्र पुरावे दिले आहेत. चौकशी केली जाईल, असा विश्वास किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला आहे. तसेच राज्यात ‘व्होट जिहाद’चे राजकारण केल्याबद्दल किरीट सोमय्या यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. विधानसभा निवडणुकीत व्होट जिहाद करण्याचा काँग्रेस आणि उद्धव ठाकरे सेनेचा डाव लवकरच उघड होईल, असे ते म्हणाले.

हे ही वाचा : 

भारताच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला १० वर्ष पूर्ण!

मनोज जरांगे उपोषण सोडणार, समाजाने सांगितले की, आणखी काही कारण?

पंतप्रधानांची फेसबुकवर पोस्ट शेअर केल्याने कट्टरपंथीयांकडून तिघांचे अपहरण करत मारहाण!

भारताची ‘पॉवर’; जपानला टाकले मागे

दरम्यान, २२ सप्टेंबर रोजी, धारावी पोलिसांनी एफआयआर नोंदवला आणि अतिक्रमण पाडण्यासाठी आलेल्या बीएमसीच्या वाहनावर रास्ता रोको आणि हल्ला केल्याप्रकरणी तीन जणांना अटक केली. बीएनएस २०२३ च्या कलम १३२, १८९ (१), १८९ (२), १८९ (४), १९०, १९१ (२), 324 (३), १९१ (३) अन्वये एफआयआर नोंदवण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा, १९८४ आणि फौजदारी कायदा (सुधारणा), २०१३ ची सुद्धा काही कलमे लावण्यात आली आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा