28 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरराजकारणजळगावचे राजकारण फिरले! महापालिकेत पुन्हा भाजपाचे बहुमत

जळगावचे राजकारण फिरले! महापालिकेत पुन्हा भाजपाचे बहुमत

Google News Follow

Related

जळगाव मध्ये भारतीय जनता पार्टीच्या तेरा नगरसेवकांनी घरवापसी केल्यामुळे जळगावचे राजकारण पुन्हा एकदा फिरले आहे. त्यामुळे जळगाव महापालिकेत भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा बहुमतात आली आहे. भाजपाने आपले १३ बंडखोर नगरसेवक परत मिळवून शिवसेनेला जोरदार धक्का दिल्याचे म्हटले जात आहे.

मार्च महिन्यात जळगाव महानगरपालिकेत झालेल्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या २७ नगरसेवकांनी बंडखोरी केली होती. या नगरसेवकांनी पक्षाचा व्हीप झुगारून शिवसेनेच्या महापौरपदाच्या उमेदवार जयश्री महाजन यांना मतदान करत विजयी केले होते. तर याच बंडखोर नगरसेवकांपैकी एक असणारे कुलभूषण पाटील हे उपमहापौरपदी विराजमान झाले होते.

गेल्या काही महिन्यांपासून हे बंडखोर नगरसेवक आणि भाजपचे नगरसेवक यांच्यात गटनेते पदावरून वादंग सुरू होता. पण या सगळ्या घडामोडींमध्ये नाट्यमय वळण येत भाजपाने आपल्या तेरा नगरसेवकांची घरवापसी करण्यात यश मिळवले आहे आणि ते सुद्धा अवघ्या चार दिवसात. शनिवारी भाजपाचे तीन बंडखोर नगरसेवक स्वगृही परत आले. तर बुधवार १३ ऑक्टोबर रोजी आणखीन दहा नगरसेवकांनी पुन्हा कमळ हातात घेतले. आगामी काळात हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हे ही वाचा:

…कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या भ्रष्टाचाराबद्दल काँग्रेसचेच नेते कुजबुजले

बळी राजाची पुन्हा निराशाच! ठाकरे सरकारकडून पुरेशी मदत नाहीच

IPL 2021: अंतिम फेरीत चेन्नईला कोलकाता भिडणार

मोदी सरकारच्या योजना मानवाधिकारांचं जतन करणाऱ्या

भाजपा नेते गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत शनिवारी शोभा बारी, सुरेश सोनवणे आणि हसिनाबी शेख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर बुधवारी मनोज आहुजा, प्रिया जोहरे, रुखसानी गबलू खान, रंजना सपकाळे, मीनाक्षी पाटील, दत्तात्रय कोळी, प्रवीण कोल्हे, मीनल सपकाळे, प्रतिभा पाटील, कांचन सोनवणे या दहा जणांनी भाजपात प्रवेश केला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा