काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी बुधवारी मणिशंकर अय्यर यांनी चीनबाबत केलेल्या वक्तव्यापासून पक्षाचा कोणताही संबंध नसल्याचे जाहीर केले. त्यांचे हे वैयक्तिक मत असल्याचे रमेश यांनी स्पष्ट केले. मणिशंकर अय्यर यांनी मंगळवारी एका कार्यक्रमादरम्यान १९६२मध्ये चिनी लोकांनी ‘कथित’पणे भारतावर आक्रमण केले, असे म्हटल्यानंतर मोठा वाद उसळला आहे. या वक्तव्याचा भाजपकडूनही समाचार घेण्यात आला. त्यामुळे काँग्रेसने अय्यर यांच्या वक्तव्यापासून हात झटकले आहेत.
जयराम रमेश यांनी आदल्या दिवशी हेदेखील स्पष्ट केले होते की, अय्यर यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल बिनशर्त माफीही मागितली आहे. मात्र एएनआयशी बोलताना रमेश म्हणाले, ‘मणिशंकर अय्यर कोण आहेत? ते अधिकारी नाहीत, माजी खासदार आणि माजी मंत्री आहेत. ते त्यांच्या वैयक्तिक क्षमतेनुसार त्यांना हवे ते बोलत आहेत.’
‘त्यांच्याशी आमचा काहीही संबंध नाही… प्रसारमाध्यमे, भाजपची ट्रोल आर्मी आणि सोशल मीडिया हेच चालवत आहेत. मात्र आज त्यांचा काँग्रेस पक्षाशी काहीही संबंध नाही. ते काँग्रेस पक्षात आहेत पण ते खासदारही नाहीत. ते फक्त केवळ माजी खासदार आहेत,’ असे जयराम रमेश म्हणाले. जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘देवाने पाठवलेले’ भाष्य आणि ‘गांधी’ (१९८२) चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी महात्मा गांधींना कोणीही कसे ओळखत नव्हते, यावर त्यांनी केलेल्या प्रतिक्रियेचाही समाचार घेतला.
हे ही वाचा:
मुंबईतील जया शेट्टी हत्याकांड प्रकरणी छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा!
केवढा हा आत्मविश्वास… नरेंद्र मोदींच्या शपथविधीचे ठिकाण, तारीखही ठरली!
रिझर्व्ह बँकेचा ताळेबंद पाकिस्तानच्या जीडीपीपेक्षा अडीचपट
निक्की हेली यांची ‘त्यांना संपवून टाका’ या संदेशासह इस्रायली क्षेपणास्त्रावर स्वाक्षरी!
देशात ‘इंडिया’ गटाची सत्ता स्थापन होईल, असा दावा जयराम रमेश यांनी केला. ‘इंडिया गटाला पूर्ण बहुमत मिळेल, हे पहिल्या दोन टप्प्यांनंतरच स्पष्ट झाले आहे. ४ जून रोजी पंतप्रधान बाहेरचा रस्ता पकडणार आहेत. इंडिया गट सरकार स्थापन करेल आणि पाच वर्षे स्थिर, संयमशील आणि जबाबदार सरकार चालवेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.