‘जगदीश टायटलर यांनी जमावाला उकसवले; पुरेसे शीख मारले गेले नाहीत, असे म्हणाले’

सीबीआयने केला दावा

‘जगदीश टायटलर यांनी जमावाला उकसवले; पुरेसे शीख मारले गेले नाहीत, असे म्हणाले’

सन १९८४च्या शीख दंगलीप्रकरणी काँग्रेसनेते जगदीश टायटलर यांना जामीन मंजूर झाला. मात्र सीबीआयने त्यांच्याविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रात अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत. ‘काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांनी दिल्लीमध्ये गुरुद्वारा पुल बंगश परिसरात शीखांना ठार मारण्यासाठी जमावाला उकसवले होते. त्यामुळे जमावाने गुरुद्वाराला आग लावली.

 

१ नोव्हेंबर १९८४ रोजी जमावाने शीख समाजातील तिघांची हत्या केली. तसेच, पुरेसे शीख मारले गेले नाहीत,’ असे या टायटलर यांनी म्हटल्याचा आरोप सन १९८४च्या शीख दंगलीप्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने आरोपपत्रात केला आहे. एका साक्षीदाराने टायटलर यांना गाडीतून बाहेर निघताना आणि जमावाला उकसवताना पाहिले असल्याचा दावाही सीबीआयने केला आहे.

साक्षीदाराच्या म्हणण्यानुसार, त्याने जमावाला दुकानांची लूट करताना पाहिले होते. तो परत येत असताना त्याला गुरुद्वारा पुल बंगशजवळ रस्त्यावर एक पांढरी ऍम्बेसेडर गाडी दिसली. या गाडीतून टायटलर बाहेर पडत होते. टायटलर यांनी सुरुवातीला जमावाला शीखांना मारण्यासाठी आणि लूट करण्यासाठी उकसावले. हे पाहिल्यानंतर ही साक्षीदार घरी परतली आणि शेजाऱ्यांच्या घरी राहिली. तिथे तिने बादल सिंह आणि गोचरणसिंह यांचे मृतदेह पाहिले. त्या मृतदेहांना टायरांच्या मदतीने पेटवून देण्यात आले होते.

अन्य एका साक्षीदाराने जमावाला लाठ्याकाठ्या, तलवारी घेऊन जाताना पाहिले. त्यांनीही तत्कालीन खासदार टायटलर हे गुरुद्वारा पुल बंगश येथे उपस्थित होते. ते गुरुद्वारावर हल्ला करण्यासाठी जमावाला उद्युक्त करत होते. त्यानंतर बसमधील प्रवाशांनी या साक्षीदाराला पगडी उतरवून घरी परत जाण्यास सांगितले. त्यानंतर लगेचच त्याने एक रिक्षा थांबवली आणि तो घरी परतला, असे एका साक्षीदाराने सांगितले.

हे ही वाचा:

लोकलमध्ये बॉम्ब ब्लास्ट होणार असल्याचा फेक कॉल

ज्या इमारतीतून दगडफेक झाली त्या नूँहमधील हॉटेलवर बुलडोझर

ग्रंथालयांचा विकास समाज आणि संस्कृतीशी निगडित

मणिपूरमध्ये जमावाने शस्त्रास्त्रे, दारूगोळा लुटला

आरोपपत्रानुसार, ‘आरोपी जगदीश टायटलर यांनी केंद्रीय नेत्यांनी त्यांना अतिशय वाईट वागणूक दिल्याचे जमावाला सांगितले. त्यांनी त्यांच्या मतदारसंघात किरकोळ शीखांची हत्या झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. मी मोठ्या प्रमाणावर शीखांच्या हत्या होतील, असा दावा केला होता आणि संपूर्ण सुरक्षाही मागितली होती. मात्र तुम्ही माझी निराशा केली, असे टायटलर यांनी म्हटल्याचा दावा सीबीआयने आरोपपत्रात केला आहे. सीबीआयने गेल्याच महिन्यात पुल बंगश परिसरात हिंसाचाराच्या प्रकरणात जगदीश टायटलर यांच्या आवाजाचे नमुने एकत्र केले आहेत. दंगलीची चौकशी करणाऱ्या नानावटी आयोगाच्या अहवालातही त्यांचे नाव नमूद आहे.

Exit mobile version