बॉलीवूड अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या नेत्या जया बच्चन या गेल्या काही दिवसांपासून चांगल्याच चर्चेत आहेत. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड आणि राज्यसभेच्या सदस्या जया बच्चन यांच्यात नावाच्या उल्लेखावरून वाद सुरू आहेत. हा वाद शुक्रवार, ९ ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा पाहायला मिळाला. यावेळी सभापती धनखड यांनी जया बच्चन यांना चांगलेच सुनावले आहे. यावेळी सभागृहात गदारोळदेखील बघायला मिळाला.
काही दिवसांपूर्वी राज्यसभेच्या तालिका सभापतींनी खासदार जया बच्चन यांचे नाव घेताना ‘जया अमिताभ बच्चन’ असा उल्लेख केला होता. त्यावर जया बच्चन यांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, शुक्रवारी पुन्हा एकदा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी जया बच्चन यांच्या नावाचा उल्लेख करताना ‘जया अमिताभ बच्चन’ असा केला. यावर पुन्हा एकदा जया बच्चन यांनी आक्रमक होत नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, मी हे सांगू इच्छिते की, मी एक कलाकार आहे. मला इतरांची देहबोली आणि चेहऱ्यावरील हावभाव समजतात. तुम्ही ज्या पद्धतीने बोलत आहात, मला तुमचा बोलण्याचा टोन मान्य नाही. आपण सहकारी आहोत, असं त्या म्हणाल्या.
हे ही वाचा:
लालू यादव यांच्या निकटवर्तीय अमित कात्यालवर ईडीची कारवाई, ११३ कोटींची मालमत्ता जप्त!
कुत्रा अंगावर पडून चिमुकलीच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी कुत्र्याच्या मालकाला अटक
“नीरजला मिळालेले रौप्य पदक हे सुवर्ण पदाकासारखेच”
भुवनेश्वर येथे एटीएमधून मिळणार गहू-तांदूळ !
जया बच्चन यांच्या या प्रतिक्रियेनंतर सभापती जगदीप धनखड यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. “तुम्ही अभिनय क्षेत्रात खूप नाव कमावलं आहे. आम्ही सर्व तुमचा आदर करतो. तुम्हाला माहिती असेल की अभिनेत्याने कुठली गोष्ट कशी सांगायची हे दिग्दर्शक ठरवत असतो. ज्या गोष्टी मी या खुर्चीत बसून बघू शकतो, त्या तुम्ही तिथे बसून बघू शकत नाही. मला दररोज हा वाद नको आहे. आता बास झालं. तुम्ही भलेही सेलिब्रिटी असाल पण तुम्हाला सदनाचे पावित्र्य राखावेच लागेल. मी हे सारखं सारखं सहन करणार नाही,” असे खडेबोल त्यांनी सुनावले आहेत.