28 C
Mumbai
Wednesday, January 15, 2025
घरराजकारणपश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार

Google News Follow

Related

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांची एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब झाले आहे. भारतीय जनता पार्टीच्या संसदीय पक्षाने धनखड यांचे नाव निश्चित केले आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पत्रकार परिषदेत धनखड यांच्या नावाची घोषणा केली.

जगदीप नड्डा म्हणाले की, एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून जगदीप धनखड यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. ते किसान पुत्र असून लोकांचे राज्यपाल म्हणून त्यांनी स्वतःची छबी निर्माण केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत धनखड यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

हे ही वाचा:

शीख नेते रिपुदमन सिंग मलिक यांची कॅनडात गोळ्या झाडून हत्या!

गुलामीच्या पाऊलखुणा पुसण्यासाठी नामांतराचा निर्णय

निर्भया पथकाकडून ३०० मुलांची सुखरूप घरवापसी!

बदलापुरात शिवसेनेत फूट; सर्व नगरसेवक मुख्यमंत्री शिंदेंसोबत

 

जवळपास तीन दशके धनखड हे राजकारणात आहेत. १९८९मध्ये लोकसभा निवडणुकीत ते झुनझुनू मतदारसंघातून निवडून आले. १९९०मध्ये ते संसदीय कार्यमंत्री म्हणून काम करत होते. १९९३मध्ये राजस्थानातील अजमेर जिल्ह्यातून किसानगड मतदारसंघातून ते राजस्थान विधानसभेवर निवडून गेले. २०१९मध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली. तिथे त्यांनी राज्यपाल म्हणून प्रचंड कार्य केले. विशेषतः सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी ते काम करत राहिले. १९ जुलै ही उपराष्ट्रपतीपदासाठी अर्ज करण्याची अखेरची तारीख आहे. तर प्रत्यक्ष निवडणूक ६ ऑगस्टला होणार आहे.

२०१७मध्ये भाजपाने तत्कालिन केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांची उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवार म्हणून घोषणा केली होती. तर बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून निवड झाली होती. या दोघांनी या निवडणुका सहज जिंकल्या आणि ते या प्रतिष्ठेच्या पदांवर विराजमान झाले. १० ऑगस्टला नायडू यांचा उपराष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे.

राष्ट्रपतीपदासाठी एनडीएने द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी दिली आहे. तर विरोधी पक्षांनी यशवंत सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
222,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा