“दीदींचे पश्चिम बंगाल महिलांसाठी असुरक्षित”

भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांची तृणमूल सरकारवर जोरदार टीका

“दीदींचे पश्चिम बंगाल महिलांसाठी असुरक्षित”

पश्चिम बंगालमधून अनेक हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून एका जोडप्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता पश्चिम बंगालमधील कूचबिहारमध्ये एका महिलेला विवस्त्र करून भररस्त्यात मारहाण करण्यात आली. महिलेला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. अशातच भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी पश्चिम बंगालमधील या हिंसाचाराच्या घटनांवरून टीएमसी सरकार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.

जे पी नड्डा यांनी ट्विट करत तृणमूल सरकारवर टीकास्त्र डागले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “पश्चिम बंगालमधून एक भयावह व्हिडिओ समोर आला आहे, जो केवळ धर्मशास्त्रांमध्ये अस्तित्वात असलेल्या क्रूरतेची आठवण करून देतो. प्रकरण आणखी वाईट करण्यासाठी, टीएमसी केडर आणि आमदार या कृत्याचे समर्थन करत आहेत. संदेशखळी असो, उत्तर दिनाजपूर असो वा अन्य कुठलेही ठिकाण; दीदींचे पश्चिम बंगाल महिलांसाठी असुरक्षित आहे,” असे म्हणत त्यांनी ममता सरकारवर टीका केली आहे.

हे ही वाचा:

धर्मवीर साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

प. बंगालमध्ये विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून जोडप्याला मारहाण करणाऱ्या टीएमसी नेत्याला अटक

… म्हणून टी-२० विश्वचषक जिंकणारा भारतीय संघ अजूनही बार्बाडोसमध्येच

देशभरात लागू झाले नवे तीन फौजदारी कायदे

दरम्यान, गेल्या चार दिवसांपूर्वी कूचबिहार जिल्ह्यातील पक्षाच्या अल्पसंख्याक सेलच्या महिला अधिकारी रोसोनारा खातून यांना घरातून बाहेर ओढून रस्त्यावर आणले आणि विवस्त्र करून मारहाण करण्यात आली. दरम्यान, पश्चिम बंगालच्या चोप्रा ब्लॉक येथे पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी असलेल्या तृणमूल काँग्रेसच्याच एका कार्यकर्त्याने ही मारहाण केल्याचा दावा केला जात आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच ताजिमूल इस्लामला पोलिसांनी अटक केली आहे. यावरून विरोधक राज्यातील ममता सरकारवर हल्लाबोल करत आहेत.

Exit mobile version