27 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरराजकारणतौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांना भाजपा देणार मदतीचा हात

तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांना भाजपा देणार मदतीचा हात

Google News Follow

Related

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी रविवार, १७ मे रोजी पक्षाच्या काही प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती. केरळ, गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, दमण, दिव आणि गुजरात या प्रदेशातील नेत्यांची बैठक नड्डा यांनी बोलावली होती. तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आलेल्या या बैठकीत नागरिकांना शक्य ती सर्व मदत भाजपा कार्यकर्त्यांनी करावी अशा सूचना नड्डा यांनी दिल्या आहेत.

एकीकडे सारा देश कोरोनाच्या संकटाशी सामना करत असतानाच आता त्यात आस्मानी संकटाचीही भर पडली आहे. अरबी समुद्रात आलेले तौक्ते चक्रीवादळ हे भारतातील काही राज्यांना थडकले आहे, तर आणखीन काही राज्यांना थडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आत्तापर्यंत कर्नाटक आणि गोवा या दोन राज्यांत या वादळाने नुकसान केले असून. महाराष्ट्रही अलर्टवर आहे. १८ तारखेला सकाळी हे वादळ गुजरातला धडकणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळेच या प्रदेशात चक्रीवादळाच्या दृष्टीने खबरदारी घेतली जात आहे.

हे ही वाचा:

तौक्ते वादळाचा कर्नाटक,गोव्याला तडाखा… गुजरात अलर्टवर

सोमवारीही मुंबईत लसीकरण बंद

आता बँक बुडाली तरी ठेवीदारांना चिंता नाही, मोदी सरकारचा नवा नियम

ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाचा मुडदा पाडला

या चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर भाजपाध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी गोवा, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, दमण, दिव, गुजरात, या किनारपट्टी लगतच्या प्रदेशातील पक्षाचे खासदार, आमदार आणि राज्य पातळीवरचे पदाधिकारी यांची एक बैठक बोलावली होती. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक पार पडली. चक्रीवादळाचा फटका बसलेल्या भागात पक्षाकडून नागरिकांना शक्य ती सर्व मदत पुरवली जावी असे आदेश यावेळी नड्डा यांनी दिले आहेत. संबंधित प्रदेशातील कोविड विषयक नियमावलीचे पालन करून ही मदत पुरवली जावी अशा सूचना त्यांनी केल्या. गेल्या वर्षीही निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या भागात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांना आपल्या परीने शक्य ती सर्व मदत पुरवण्याचा प्रयत्न केला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
198,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा