बंगालमध्ये भगव्याचा बोलबाला

बंगालमध्ये भगव्याचा बोलबाला

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘बंगालमध्ये भगव्याचा बोलबाला सुरू झाला आहे.’ असे मत व्यक्त केले आहे. मुंबई येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले आहे.

२ मे रोजी झालेल्या मतमोजणीत पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार समाधान आवताडे विजयी झाले आहेत. त्यांच्या या विजयासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरच्या जनतेचे आभार मानले. विठ्ठलाने आम्हाला आशिर्वाद दिला आहे आणि हा विजय आम्ही विठ्ठलाच्या चरणी अर्पण करतो असेही फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा:

पंढरपूरमध्ये भाजपाला विठ्ठल पावला

निवडणुकांचे निकाल भाजपासाठी ‘समाधान’कारक

योग्य वेळ आली की सरकारचा करेक्ट कार्यक्रम करणार

भाजपाच्या वनाथी यांनी दिली कमल हसनना धोबीपछाड

यावेळी आज लागलेल्या पाच विधानसभा निवडणुकांच्या निकालांविषयी विचारले असता त्यांनी आपले मत व्यक्त केले. आसाममध्ये आम्ही पुन्हा सत्तेत आल्याचा आनंद आहे. दक्षिणेकडील पुदुचेरीही आम्ही मिळवले आहे. तामिळनाडूची लढत एकतर्फी होईल असे म्हटले गेले असले तरिही ती निवडणूक तशी झाली नाही. आमच्या आघाडीने तिथे चांगले यश मिळवले. पश्चिम बंगालमध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळाले नसले तरिही तीन जागांवरून आम्ही मारलेली मजल ही खूप मोठी गोष्ट आहे. बंगाल निवडणूकांचे विश्लेषण एका शब्दात करायचे झाले तर आज बंगाल काँग्रेस आणि कम्युनिस्ट मुक्त झाला. बंगालमध्ये आता भगव्याचा बोलबाला सुरू झाला आहे. आजवर जिथे फक्त डावे विचार होते तिथे आता हिंदुत्ववादी विचारांना भक्कम पाया लाभलाय.

महाविकास आघाडीचे नेते दुसऱ्याला मुल झाल्याचे पेढे वाटतायंत
मी राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहात होतो. ते दुसऱ्याला मुल झाल्याचे पेढे वाटतायंत, ढोल वाजवतायंत असा टोला फडणवीसांनी लागावला आहे. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असे ऐकले होते ते आज प्रत्यक्ष पाहायला मिळाले. काँग्रेसची अवस्था आपण पहिली, शिवसेनेचे अस्तित्वच नाहीये आणि राष्ट्रवादी काँग्रेस आजच हारली आहे. पण अविर्भाव असा आणत आहेत की ममता बॅनर्जी जिंकल्या म्हणजे तेच जिंकले आहेत. पण या पश्चिम बंगालच्या निकालांमुळे आता ईव्हीएम वर टीका होणार नाही असा चिमटाही फडणवीसांनी जाता जाता काढला

Exit mobile version