अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणे ही चूक!

अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणे ही चूक!

संजय राऊत यांनी केले विधान

अनिल देशमुख यांचा राजीनामा घेणे ही चूक होती. घ्यायला नको होता. पण नवाब मलिक कॅबिनेटमध्ये राहतील. खोटे आरोप करून त्यांना फसवत असाल, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असाल तर ते योग्य नाही. भाजपाचा भ्रम होता कॅबिनेट जेलमध्ये टाकतील. पण तसे झाले नाही, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नागपुरात केले.

शिवसंपर्क मोहिमेसाठी आलेले असताना पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना संजय राऊत म्हणाले की, तुमच्याकडे जशी सेंट्रल एजन्सी आहे तसेच आमच्याकडे पोलिस आहेत. येणाऱ्या दिवसात तुम्हाला कळेल. कॅबिनेट जेलमध्ये जाते की आणखी कुणी जाते ते. पण अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा निर्णय घाईने झाला. त्याबाबत थोडे संयमाने घ्यायला हवे होते. देशमुखांच्या बाबतीत काय पुरावे आहेत ते आम्ही पाहिले आहेत. त्यांच्या घरावर सीबीआयने २२ धाडी घातल्या, ईडीच्या ५० पेक्षा अधिक धाडी,आयकर खात्याने ४० धाडी घातल्या. एका माणसावर एवढ्या धाडी घालून कोणता विक्रम केला?

देशभरात भाजपाचे सूडाचे राजकारण सुरू आहे. महाराष्ट्राला परंपरा आहे. पण महाराष्ट्र वाकणार नाही.भ्रष्टाचारांचे अनेक पुरावे आहेत आमच्याकडे आहेत. शेकडो घोटाळे आमच्याकडे आहेत. ते दिले आहेत. पण केंद्रीय तपास यंत्रणांपेक्षा आमचे पोलिस अधिक सक्षम आहेत, असेही राऊत म्हणाले.

हे ही वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदींही त्यांच्यापुढे झाले नतमस्तक

कंभोज यांच्या घराकडे आता पालिकेची वक्रदृष्टी

अफगाणिस्तानच्या अर्थमंत्र्यांना चालवावी लागतेय टॅक्सी

कुर्ल्याच्या गोवावाला कंम्पाऊंडमध्ये ईडीची छापेमारी  

 

पाकव्याप्त काश्मीर (पीओके) भारतात घेऊ असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी म्हटल्याचे वाचले. आम्ही वाट पाहतोय कधी पीओके आणताय. आम्ही राष्ट्रभक्त आस लावून बसलो आहोत. तेव्हा आणा लवकर पीओके भारतात. पण पीओके फाइल्स चित्रपट काढू नका. सिनेमे काढल्याने पीओके येणार नाही. सात वर्षांत काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन झाले नाही. १६ टक्के घरे देऊ शकले. त्याचे दुःख आहे. बाळासाहेब एकमेव नेते होते. त्यांनी काश्मिरी पंडितांना आसरा दिला व जागा राखीव ठेवल्या.

Exit mobile version