26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरक्राईमनामाRTO मधील 'सचिन वाझे' असलेल्या बजरंग खरमाटेच्या घरी आयकर विभागाची धाड

RTO मधील ‘सचिन वाझे’ असलेल्या बजरंग खरमाटेच्या घरी आयकर विभागाची धाड

Google News Follow

Related

मंगळवार, ८ मार्च रोजी महाराष्ट्रात ठिकठिकाणी आयकर विभागाचे धाडसत्र पाहायला मिळाले. शिवसेनेशी संबंध असलेल्या लोकांवर या धाडी पडत असल्याचे दिसले. एकीकडे मुंबईमध्ये आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल आणि अनिल परब यांचे निकटवर्तीय संजय कदम यांच्या घरी आयकर विभागाची धाड पडली असतानाच. दुसरीकडे पुण्यातही अनिल परब यांचे निकटवर्तीय असलेल्या बजरंग खरमाटे यांच्या घरी आयकर विभागाची धाड पडली आहे.

बजरंग खरमाटे हे महाराष्ट्र सरकारच्या आरटीओ म्हणजेच वाहतूक विभागात कार्यरत आहेत. बजरंग खरमाटे हे परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जातात. आज सकाळीच खरमाटे यांच्या घरी आयकर विभागाचे पथक पोहोचले असून त्यांच्याकडून खरमाटे यांच्या घराची झाडाझडती केली जात आहे. खरमाटे यांच्यावर होणारी कारवाई हा अनिल परब यांना धक्का मानला जात आहे.

हे ही वाचा:

जगभर साजरा होतोय महिला दिन! या वर्षी आहे ‘ही’ खास थीम

शिवसेना नेते संजय कदम यांच्यावर आयकर विभागाची धाड!

कोण आहे हा बजरंग खरमाटे? आमदार भातखळकरांनी विचारला सवाल

आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनालवर आयकर विभागाचे छापे

दरम्यान बजरंग खरमाटे हे अनिल परब यांचे सचिन वाझे आहेत असे भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी म्हटले आहे. या आधी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात बजरंग खरमाटे हे नाव चर्चेत आले होते. त्यावेळी खरमाटे यांची सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या मार्फत चौकशी करण्यात आली होती. त्यावेळीही खरमाटे याच्या माध्यमातून बदल्यांचे रॅकेट अनिल परब चालवत असल्याचा आरोप करण्यात आला होता.

या सोबतच आज सकाळपासून अशाच प्रकारची कारवाई आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल आणि अनिल परबांचे खास मानले जाणारे संजय कदम यांच्यावरही होताना दिसली. या दोन्ही नेत्यांच्या राहत्या घरी आयकर विभागाचे एक पथक सकाळी दाखल झाले आणि शोधकार्य सुरु केले. शिवसेनेशी जवळीक असलेल्या लोकांवर होणारी हि कारवाई राज्यातील ठाकरे सरकारला अडचणीत आणणारी असल्याचे म्हटले जात आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा