25 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरराजकारणकोविशिल्डच्या मात्रांमधील अंतर वाढवणे तार्किक- जगविख्यात संसर्गतज्ज्ञ डॉ. फाऊकी यांचे मत

कोविशिल्डच्या मात्रांमधील अंतर वाढवणे तार्किक- जगविख्यात संसर्गतज्ज्ञ डॉ. फाऊकी यांचे मत

Google News Follow

Related

विरोधकांना अतुल भातखळकरांनी लगावला टोला

काल (१३ मे रोजी) केंद्र सरकारने कोविशिल्डच्या दोन मात्रांमधील अंतर वाढून १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावरून समाजमाध्यमांवर अनेक विरोधकांनी सरकारवर तोंडसुख घ्यायला सुरूवात केली. मात्र अमेरिकेतील विख्यात संसर्गतज्ज्ञ डॉ. अँथनी फाऊची यांच्या विधानामुळे त्या सर्वांचा मुखभंग झालेला आहे. त्याबरोबरच भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी देखील या बातमीच्या आधारे विरोधकांवर निशाणा साधला आहे.

नेमके काय घडले?

केंद्र सरकारने कोविशिल्ड या लसीच्या दोन डोस मधील अंतर कालपासून १२ ते १६ आठवड्यापर्यंत वाढवले. त्यानंतर नेटवर अनेक विरोधकांपासून ते स्वयंघोषित तज्ज्ञांपर्यंत सर्वांनी यावरून सरकारवर तोंडसुख घ्यायला सुरूवात केली होती. मात्र आज ‘द इंडियन एक्सप्रेस’ या वृत्तसंस्थेच्या संकेेतस्थळावर अमेरिकेतील जगविख्यात संसर्गतज्ज्ञ डॉ. अँथनी फाऊची यांनी एएनआयला दिलेली मुलाखत झळकली होती. या मुलाखतीत भारताने उचललेले हे पाऊल तार्किक असल्याचे म्हटले आहे.

हे ही वाचा:

परदेशी शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्याने लस द्या

खान मार्केटमध्ये अवैध ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रकरणात नवनीत कार्लाला जामिन नाहीच

…..तर आपण एक जबाबदर राज्यकर्ते म्हणून कमी पडू!

ठाकरे सरकार खोटं बोलत होतं- विनायक मेटे

आधी विरोधकांनी सरकारवर तोंडसुख घेतल्यानंतर डॉ. अँथनी फाऊची यांच्या विधानामुळे विरोधकांचा पुरता मुखभंग झालेला आहे. त्यानंतर भाजपाचे आक्रमक आमदार अतुल भातखळकर यांनी देखील ट्वीटरवरून विरोधकांना टोला लगावला आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे,

टोचलं असेल ना…कोव्हिशील्डच्या दोन मात्रांमधील कालावधी १२ ते १६ आठवड्यांपर्यंत वाढवण्याच्या केंद्राच्या निर्णयाला आक्षेप घेणाऱ्यांना अमेरिकेतूनच ‘टोचणी’. जगविख्यात संसर्गतज्ज्ञ डॉ. अँथनी फाऊची यांनीच हा निर्णय परिणामकारक म्हणत विरोधकांचे कान टोचले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा