भाजापाच्या विरोधात सगळे विरोधक एकवटले तरीही फक्त तेवढंच उपयोगाचे नाही, एवढच काय राहुल गांधींची भारत जोडो यात्रा केल्यामुळे सुद्धा त्यांच्या निवडणुकांना काहीच फायदा होणार नसल्याचे मत प्रशांत किशोर यांनी मांडले आहे. विरोधी पक्षांची एकजूट हा फक्त त्यांचा देखावाच आहे फक्त नेते एकत्र येऊन भाजपाला हरवणे शक्य नाही, असेही प्रशांत किशोर यांनी एका मुलाखतीत म्हंटले आहे.
प्रशांत किशोर काय म्हणाले ?
भाजपाला आव्हान द्यायचे असेल तर तुम्हाला भाजपाची ताकद आणि त्यांची बलस्थाने माहिती असणे आवश्यक आहेत. म्हणजेच हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि कल्याणवाद काय आहे तो समजायला हवा. भाजपाला आव्हान द्यायचे असेल तर कुठल्याही विरोधकाला याच तीन गोष्टी विचारात घेऊन भाजपाला आव्हान द्यावे लागेल. हिंदुत्ववादी विचारधारांशी लढा देण्यासाठी विचारधारांची एकजूट असणे आवश्यक आहे. गांधीवादी, समाजवादी, आंबेडकरवादी आणि कम्युनिस्ट या विचारधारा अत्यंत महत्वाच्या आहेत. पण या विचारधारांच्या आधारे तुम्ही अंधविश्वास ठेऊ शकत नाही.
त्या विचारधारा भाजपच्या विचारधारेला टक्कर देऊ शकतात का? हा विचार त्यांना करावा लागेल असेही पुढे प्रशांत किशोर म्हणाले. मी सध्या बघतोय विरोधी पक्षांचे नेते एकमेकांसोबत दिसत आहेत, कोणी लंच करत आहेत, तर कोणी एकमेकांबरोबर चहा घेत आहेत. मला विचारधारांची युती झालेली बघायला आवडेल. कारण एकत्र चहा घेऊन किंवा जेवण घेऊन भाजपाला हरवण्याची पद्धत नाही असेही ते पुढे म्हणाले. सध्या प्रशांत किशोर जनसुराज यात्रा करत बिहारचा दौरा करत आहेत. प्रशांत किशोर यांच्या नावावर २०१४ च्या निवडणुकांचे अनेक विजय आहेत.
हे ही वाचा:
राज्यात अखेर गो आयोगाची स्थापना
‘खलिस्तानी चळवळीला लंडनमधील शीख समुदायाने नाकारले आहे!’
नेरुळ येथे बांधकाम व्यावसायिकाला गोळ्या घालणारे सापडले बिहारमध्ये
रवींद्र वायकर सुद्धा ठाकरेंना सोडून चालले का?
याठिकाणी बिहार बाबत ते म्हणाले कि, बिहारचे राजकारण अनेक चुकीच्या समजुतींसाठी प्रसिद्ध आहे. शिवाय ते जातीपातीच्या बंधनात अडकले आहे. सध्या इथे लोक काय करू शकतात ते किती सक्षम आहेत हे आम्ही बघण्याचा प्रयत्न करत आहोत. मागच्या सहा महिन्यात राहुल गांधींवर टीका झाली आणि त्यांची स्तुती सुद्धा झाली. त्यांची भारत जोडो यात्रा काढली ती फक्त चालण्याशी संबंधित नव्हती जेव्हा तुम्ही सहा महिने चालता, भारत जोडो सारखी यात्रा काढता त्यावेळेस तुम्हाला पक्षामध्ये काही तरी बदल झालेले दिसले पाहिजेत. ही यात्रा काँग्रेसचे भवितव्य ठरवणारी आहे. माझ्यासाठी यात्रा म्हणजे मिशन नाही तर ज्या भागांत ती यात्रा जाते तो भाग समजून घेण्याचा प्रयत्न आहे, असे प्रशांत किशोर यांनी म्हंटले आहे.