काँग्रेस महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करेल, हे मान्य नाही

संजय राऊतांनी नाना पटोले यांचे वक्तव्य फेटाळले

काँग्रेस महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करेल, हे मान्य नाही

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी बोलताना महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले जाईल, हे वक्तव्य फेटाळून लावले. यावर संजय राऊत म्हणाले की, हे कोणीही मान्य करणार नाही. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले तर आता मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू होईल का अशा चर्चा होत आहेत. जागा वाटपावरूनही निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीमध्ये कलह निर्माण झाला होता. यानंतर आता मुख्यमंत्री पद हे बिघाडीचे कारण ठरेल का अशा चर्चा होत आहेत.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “मुख्यमंत्री पद या विषयावर युतीसोबत एकत्रितपणे चर्चा करण्याची गरज आहे. नाना पटोले असे म्हणाले असतील तर मी हे मान्य करणार नाही आणि कोणीही मान्य करणार नाही. नाना पटोले यांना काँग्रेस हायकमांडचा पाठिंबा आहे का? हे आम्ही एकत्र बसून ठरवू. काँग्रेस हायकमांडने म्हटले आहे की, जर नाना पटोले हे मुख्यमंत्री होत आहेत, तर राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी यांनी तशी घोषणा करावी,” असं म्हणत संजय राऊत यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.

हे ही वाचा..

मुरादाबादमध्ये मिडीया जिहाद? सक्रीय पत्रकारांची यादी जाहीर

भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांचा राहुल गांधींवर जोरदार प्रहार

युवराज म्हणतात, अदानींना अटक करा!

एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांची हॉटेलवारी होण्याची शक्यता!

याआधी नाना पटोले यांनी असा दावा केला होता की, मतदानाचा ट्रेंड आणि लोकांच्या फीडबॅकच्या आधारे काँग्रेस महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करेल. ज्या पद्धतीने मतदानाचा ट्रेंड येत आहे आणि लोक काय म्हणत आहेत, त्यावरून राज्यात सर्वाधिक काँग्रेसचे उमेदवार निवडून येतील. महाविकास आघाडी सरकार स्थापन होईल आणि मुख्यमंत्री एमव्हीएचाच असेल यात शंका नाही, असे नाना पटोले म्हणाले.

Exit mobile version