‘वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये औरंगजेब, टिपू सुलतनाचं उदात्तीकरण होणं हा योगायोग नाही’

उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांवर टीकास्त्र

‘वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये औरंगजेब, टिपू सुलतनाचं उदात्तीकरण होणं हा योगायोग नाही’

कोल्हापूर शहरातील एका गटाच्या तरुणांनी व्हाट्सऍपवर ठेवलेल्या वादग्रस्त स्टेटसमुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे. शहरात काही ठिकाणी घर, दुकानांवर दगडफेक झाली. यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत विरोधकांवर निशाणा साधला आहे. नवी मुंबई विमानतळाच्या कामाची पाहणी करण्याकरता गेले असताना देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.

‘कोल्हापूरमध्ये विरोधी पक्षाचे नेते म्हणतात मला माहित आहे येथे दंगल घडणार आहे. काही वळाने औरंगजेब आणि टिपू सुलतान याचं उदात्तीकरण करतात. त्यानंतर एक प्रतिक्रिया येते. या विधानाचा आणि घटनांचा संबंध आहे का? अचानकपणे महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचं उदात्तीकरण करणारे कोण आले? कोण यांना फूस लावतंय? कोण यांना उदात्तीकरण करण्याकरता सांगतंय? याची चौकशी करत आहोत,’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

‘काही गोष्टी आम्हाला समजत आहेत. पण सर्व चौकशी झाल्यानंतर सर्व गोष्टी सांगणार. अचानकपणे अशाप्रकारे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये औरंगजेब आणि टिपू सुलतनाचं उदात्तीकरण सुरू होणं हा काही योगायोग नाही. त्यातून विरोधी पक्षाच्या लोकांनी दंगली घडवण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर विशिष्ट समाजाकडून औरंगजेबाचं उदात्तीकरण होणं हा योगायोग असू शकत नाही. त्यामुळे निश्चितपणे याच्या खोलात जावंच लागेल,’ असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिला आहे.

‘औरंगजेबाचे उदात्तीकरण खपवून घेतले जाणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. यांचे काही नेते औरंजेबाला देशभक्त ठरवायला निघाले आहेत. त्यामुळे औरंगजेब कोणाला जवळचा वाटतो हे आपल्या सर्वांना माहित आहे. सर्व एकाचवेळी एका सुरात बोलतात आणि त्याला प्रतिसाद लगेच कसा मिळतो याची चौकशी करणार,’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा:

युक्रेनमधील धरण कोसळल्यानंतर ग्रामस्थांचे पलायन

दक्षिण आफ्रिकेतील विशेष कार्यक्रमात ‘आयएनएस त्रिशूल’ सहभागी होणार

वसतीगृहात तरुणीचा बलात्कार करून हत्या करणाऱ्या सुरक्षा रक्षकाची आत्महत्या

मृतदेहांतून हात बाहेर आला आणि बचावकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्याचा पाय पकडला!

देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावरही टीकास्त्र डागले आहे. निवडणुका जवळ आल्या की शरद पवार काय बोलतात ते डायलॉग्ज आम्हाला पाठ झाले आहेत असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

‘ट्रेंड बदलण्याची स्वप्न पवारसाहेब वर्षानुवर्षे पाहत आहेत. २०१४, २०१९ मध्ये त्यांनी लोकसभा निवडणुकीत ही स्वप्न पाहिली. विधानसभेतही पाहिली. पण ती काही पूर्ण झाली नाहीत. निवडणुका आल्या की शरद पवारांचे डायलॉग काय असतील याची आम्हाला सवय झाली आहे. देशभरात मोदी विरोधी वातावरण आहे म्हणत आहेत कुठे आहे मोदीविरोधी वातावरण? ३०० पेक्षा जास्त लोक निवडणून आले तरीही मोदीविरोधी वातावरण दिसतं आहे,’ अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर केली आहे.

Exit mobile version