‘शहापूर- खोपोली मार्गाचे काम राज्याकडे सोपवले ही मोठी चूक’

‘शहापूर- खोपोली मार्गाचे काम राज्याकडे सोपवले ही मोठी चूक’

शहापूर- मुरबाड- खोपोली या राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळालेल्या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. या मार्गावर अनेक अपघात होत असून, ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी आहेत. महामार्गाच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून अधिकाऱ्यांकडून साधी तपासणीही होत नसल्याचे त्यांनी सांगितले. शहापूर- मुरबाड- खोपोली या राष्ट्रीय महामार्गाचे काम केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) सोपवले आहे; परंतु हे काम एमएसआरडीसीकडे सोपवून मोठी चूक केल्याची कबुली केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी देऊन राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

या रस्त्याचे तूर्तास सहा मीटर रुंदीपर्यंतच काम करावे. उर्वरित रुंदीकरण भूसंपादनानंतर करण्याचे निर्देश केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी बुधवारी दिले. कामची दुरवस्था, अपुरी कामे आणि भूसंपादनासंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला मुरबाडचे आमदार किसन कथोरे, शहापूरचे आमदार दौलत दरोडा, माजी आमदार गोटीराम पवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार, सभापती वंदना भांडे, दशरथ तिवरे उपस्थित होते.

हे ही वाचा:

दादर, मुलुंडमधील लोक वैतागले दूषित पाण्याला

विद्यापीठ अधिकारी घेऊ शकणार फक्त १२ लाखांपर्यंतच गाडी!

तिला व्हायचे आहे बॅडमिंटनपटू; पण पोट भरण्यासाठी चिरावी लागतेय भाजी

सेंट्रल व्हिस्टावरून मोदींनी धरले विरोधकांना धारेवर

शहापूर- मुरबाड- खोपोली या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा दर्जा निकृष्ट असून, एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांकडून कामाची तपसणी केली जात नाही. ग्रामस्थांच्या वारंवार तक्रारी येत असून अपघातांचे प्रमाण वाढल्याचे आमदार किसान कथोरे यांनी सांगितले. रस्त्याच्या मालकीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पुरावेच नाहीत. त्यामुळे सध्या केवळ सहा मीटर रुंद रस्त्याचे काम पूर्ण करावे. उर्वरित रस्त्याचे रुंदीकरण शेतकऱ्यांना पैसे दिल्यानंतर जमिनी ताब्यात घेऊन करावे, असे आदेश केंद्रीय राज्यमंत्री पाटील यांनी दिले. तसेच मूळ जमीनमालक आणि सध्या जमिनीवर बांधकाम केलेल्या नागरिकांमधील वादावर स्थानिक नेत्यांनी समन्वय साधून मार्ग काढावा, असे आवाहनही पाटील यांनी केले.

Exit mobile version