27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारण“मी मुख्यमंत्री असलो काय आणि नसलो काय काहीही फरक पडत नाही”

“मी मुख्यमंत्री असलो काय आणि नसलो काय काहीही फरक पडत नाही”

Google News Follow

Related

शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यासोबत महाराष्ट्रात सरकार स्थापन केले पण आपण मुख्यमंत्री असलो काय किंवा नसलो काय असेही ते म्हणत आहेत. शिवसेनेच्या ५६व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला तेव्हा ते बोलत होते.

“मला मी मुख्यमंत्री असलो काय आणि नसलो काय काहीही फरक पडत नाही. माझं नाव आहे ते कोणीच काढून घेऊ शकणार नाही. कित्येक जन्माचं भाग्य लाभलं आणि हे नाव मिळालं आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा:

सायबर चोरट्यांनी सीए तरुणीला दीड लाख रुपयांचा घातला गंडा

बिहारमधून ७१८ आंदोलकांना अटक; १३८ गुन्हे दाखल

५०० वर्षांनी कालिका मंदिरावर पंतप्रधान मोदींनी फडकाविली पताका; मेहमूद बेगडाने तोडले होते मंदिर

फिनलँडमध्ये नीरज चोप्राची सुवर्ण कमाई

त्यानंतर त्यांनी २० जून रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीवरही भाष्य केले. “मला उद्याच्या निवडणुकीची अजिबात चिंता नाही. शिवसेनेमध्ये गद्दार कोणी राहिलेला नाही, राज्यसभा निवडणुकीत मत फुटलेलं नाही. कुणी काय कलाकाऱ्या केला हे कळालं आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच त्यांनी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यावरही भाष्य केलं. आमदारांची बडदास्त ठेवावी लागते, यालाच लोकशाही म्हणतात. आपण फाटाफुटीचं राजकारण भोगत आलो आहोत. पण कितीही फाटलं, तरी शिवसेना अजून मजबुतीनं उभी राहिली आहे, हे इतिहासाला आपण दाखवलं आहे. अशीच फाटाफूट मागे झाली, तेव्हा शिवसेना प्रमुख म्हणाले होते मला आईचं दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा