वळसे पाटीलांच्या निकटवर्तीय उद्योजकावर आयकर विभागाचे छापे

वळसे पाटीलांच्या निकटवर्तीय उद्योजकावर आयकर विभागाचे छापे

पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील प्रसिद्ध उद्योजक देवेंद्र शहा यांच्या घरावर आणि कार्यालयांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. गुरुवार २५ नोव्हेंबर रोजी आयकर विभागामार्फत ही कारवाई करण्यात आली आहे. अचानक करण्यात आलेल्या या छापेमारीने आंबेगावात एकच खळबळ उडाली. उद्योजक देवेंद्र शहा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्तीय आहेत.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे देवेंद्र शहा यांच्या व्यवसायाच्या ठिकाणांवर आयकर विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली. देवेंद्र शहा यांच्या पराग मिल्क या दुग्ध उद्योग समूहावर छापेमारी झाली. आयकर विभागाच्या एकूण चार पथकांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. देवेंद्र शहा यांचे पराग मिल्क आणि गोवर्धन उद्योग समूह यांचे मोठे जाळे आहे. औसा येथील पिरसाहेब या डेअरीचे पराग मिल्क उद्योगसमूहा सोबत काही संशयास्पद व्यवहार आयकर विभागाला आढळून आले. त्यामुळेच आयकर विभागामार्फत ही कारवाई सुरू करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे.

हे ही वाचा:

परमबीर यांची युनिट ११ कडून कसली सुरू आहे चौकशी?

शशिकांत शिंदे पडला, त्याला शिवेंद्रराजे जबाबदार

स्वीडनला मिळाल्या पहिल्या महिला पंतप्रधान! पण काही तासांतच दिला राजीनामा

वानखेडेंविरोधात ट्विट करणार नाही! नवाब मलिक मुंबई उच्च न्यायालयासमोर नमले

२५ नोव्हेंबर रोजी पहाटे सव्वा दोनच्या सुमारास मंचर येथील पराग डेअरी इथे आयकर विभागाने छापा टाकला. अंदाजे तासाभराने साडे तीनच्या सुमारास अवसरी येथील पिर डेअरीवर आयकर विभागाचे पथक धडकले. त्यानंतर सकाळी सात वाजता देवेंद्र शहा यांच्या निवास्थानी आयकर विभागाच्या पथकाने धडक दिली असून सकाळी नऊ वाजता शहांच्या मित्राच्या घरी छापेमारी करण्यात आली आहे.

Exit mobile version