राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या चांगलेच अडकलेले दिसत आहेत. आधीच त्यांच्यामागे सीबीआय आणि इडीचा ससेमिरा सुरू असतानाच त्यांच्या घरावर आता आयकर विभागाचे छापेही पडले आहेत. शुक्रवार, १७ सप्टेंबर रोजी अनिल देशमुख यांच्या घरावर आयकर विभागाने छापे टाकले. अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील मालमत्तेवर आयकर विभागाने या धाडी टाकल्या आहेत. त्यामुळे आयकर विभागाच्या तपासातून नेमके नवीन काय समोर येणार? याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या चांगलेच अडचणीत आहेत. परमबीर सिंह यांनी केलेल्या शंभर कोटी वसुलीच्या आरोपांवरून अनिल देशमुख यांना आपले मंत्री पद तर गमवावे लागलेच. पण त्यांच्या मागे इडी आणि सीबीआयचः शुक्लकाष्टही सुरू आहे. त्यांच्या घराची झडती घेण्यात आली असून त्यांची काही कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तर इडी कडून आतापर्यंत त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी पाच वेळा समन्स बजावण्यात आले आहे.
हे ही वाचा:
दादर, मुलुंडमधील लोक वैतागले दूषित पाण्याला
विद्यापीठ अधिकारी घेऊ शकणार फक्त १२ लाखांपर्यंतच गाडी!
तिला व्हायचे आहे बॅडमिंटनपटू; पण पोट भरण्यासाठी चिरावी लागतेय भाजी
सेंट्रल व्हिस्टावरून मोदींनी धरले विरोधकांना धारेवर
हे सारे असतानाच देशमुखांच्या मागे आता आयकर विभागही लागला आहे. शुक्रवार, १७ सप्टेंबर रोजी आयकर विभागाने अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानावर छापे टाकले आहेत. नागपूरच्या जीपीओ चौकात असलेल्या अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावर आयकर विभागाचे अधिकारी जाऊन धडकले. तर काटोल परिसरातील त्यांच्या निवासस्थानावरही छापेमारी झाली आहे. यासोबतच नागपूर येथील हॉटेल ट्रॅव्होटेल येथेही आयकर विभागाने धाड टाकली. या सर्व तपासातून नेमके काय समोर आले याचा तपशील अद्यापही मिळाला नाही. तरि अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.